Viral Video: अत्यंत घृणास्पद! मंदिरात पॉर्न व्हिडिओ पाहत करत होता हस्तमैथुन; व्हायरल व्हिडिओनंतर लोकांचा संताप

Viral Video News: कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैद झाली आहे. व्यक्ती मंदिराच्या आत झोपला होता. यावेळी तो मोबाईलमध्ये पॉर्न व्हिडिओ पाहत असल्याचं दिसून आलंय.
Viral Video
Viral Video
Updated on

नवी दिल्ली- उत्तर प्रदेशच्या गाझीयाबादमध्ये एका मंदिरात संतापजनक प्रकार घडला आहे. एक व्यक्ती मंदिरामध्येच देवाच्या मूर्तीसमोरच अश्लील वर्तन करत होता. कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैद झाली आहे. व्यक्ती मंदिराच्या आत झोपला होता. यावेळी तो मोबाईलमध्ये पॉर्न व्हिडिओ पाहत असल्याचं दिसून आलंय. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मिडिया व्हायरल होत आहे.

एका व्यक्तीने यासंदर्भातील व्हिडिओ शूट केला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका धार्मिक ठिकाणी अशाप्रकारचे कृत्य झाल्यामुळे लोकांनी रोष व्यक्त केला आहे. व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार व्हिडिओ, गाझीयाबादमधील फरिदनगरमधील भोजपूर मंदिरातील आहे. पोलिसांनी यासंदर्भात कारवाई केली आहे.

Viral Video
Crime News: 11 वर्षाच्या मुलाकडून 4 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; घरी गेला, चॉकलेट दिलं अन्...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.