सोशल मीडियावरील हा व्हिडिओ खूप शेअर केला जात आहे.
सोशल मीडियावर (Social Media) तुम्ही देसी जुगाडचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील, असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होतोय. त्या व्हिडिओला तुम्ही पाहातच राहाल. या व्हिडीओमध्ये देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही एक लहान मुलगा ज्या पद्धतीने मासेमारी करतंय ते पाहून आश्चर्य व्यक्त केलेलं आहे. यानंतर त्यांनी हा व्हिडिओ ट्विट करत मुलाचं कौतुक केलंय.
महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी मुलाच्या जुगाडाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत एक गोष्ट लिहिली आहे. या व्हिडिओमध्ये मुलगा देसी जुगाड लावून मासेमारी करताना दिसत आहे. आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, कोणताही तपशील न घेता हा व्हिडिओ त्यांच्या इनबॉक्समध्ये सापडला आहे. आनंद महिंद्रा पुढे म्हणाले की, अशा व्हिडिओमुळे या गोंधळलेल्या जगात मोठ्या शांततेची भावना निर्माण होते. त्यांनी लिहिले, 'निश्चय + साधेपणा + संयम = यश'
व्हिडिओमध्ये पाहू शकता की मुलगा लाकडी स्ट्रक्चर घेऊन आला आहे. ती वस्तू तो नदीच्या काठावर ठेवतो. यानंतर तो त्यातील दोरखंडात अडकवतो. त्यानंतर तो पाण्यात फेकून देतो. जेव्हा त्याला मासे अडकल्याचे जाणवते तेव्हाच मुलगा काही क्षण बसून राहतो. यानंतर तो लाकडावर चाक फिरवू लागतो आणि दोरा ओढतो. दोरखंडात दोन मोठे मासे अडकल्याचे तुम्हाला दिसेल.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत एक कोटीहून अधिक लोकांनी पाहिले आहे. जवळपास 70 हजार लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. बहुतांश युजर्स मुलाच्या देसी जुगाडचं कौतुक करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.