Video: धक्कादायक! साधुने दिली महिलांवर बलात्कार करण्याची खुलेआम धमकी

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी महंताविरोधात कारवाई केली आहे
viral video
viral videoसकाळ डिजिटल टीम
Updated on

उत्तर प्रदेश येथील एका महंताचे वादग्रस्त भाषण चर्चेचा विषय ठरले. एखाद्या हिंदू मुलीवर विशिष्ट समाजातील लोकांनी छेडछाड केली, तर त्यांच्या मुली आणि सुनेवर उघडपणे बलात्कार करणार असे वक्तव्य त्यांनी केले. महंत बजरंग मुनी दास नवरात्री आणि हिंदू नववर्षासंदर्भात सीतापूरमध्ये काढलेल्या शोभायात्रेत प्रक्षोभक भाषण करताना बोलत होते. यासंदर्भातील त्यांचा वादग्रस्त वक्तव्याचा एक व्हिडिओ समोर आलाय. Viral video: mahant bajrang das muni threatens to rape women, Uttar Pradesh)

viral video
‘एव्हीजीसी’साठी कृती समिती स्थापन

या व्हिडीओमध्ये महंत बजरंग मुनी दास हिंदू मुलींची छेड काढणाऱ्या दुसऱ्या समाजातील मुली आणि सुनेवर बलात्कार करण्याची धमकी देत आहेत. साधूचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी महंताविरोधात कारवाई केली आहे. हा व्हिडिओ 2 एप्रिलचा असल्याचे बोलले जात आहे.

खैराबाद मशिदीजवळून मिरवणूक जात असताना महंतांनी हे वक्तव्य केले ते व्हिडीओमध्ये म्हणतात, "मी तुम्हाला हे प्रेमाने सांगतोय, जर तुम्ही खैराबादमध्ये एकाही हिंदू मुलीची छेड काढली तर मी तुमच्या मुली सुनेला घरातून उघडपणे उचलून नेईन आणि तिच्यावर बलात्कार करीन." महंत पुढे म्हणाले, "माझ्या हत्येसाठी 28 लाख रुपये जमवण्यात आले. माझ्या हत्येचा कट रचला जात आहे."

viral video
कोरोना पुन्हा वाढतोय! दिल्ली, हरयाणासह ५ राज्यांमध्ये रुग्णसंख्येत वाढ

या संदर्भात पोलिस तपास करत आहे. वस्तुस्थिती व पुराव्यांच्या आधारे नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार, असे पोलिसांनी म्हटलं आहे. यादरम्यान राष्ट्रीय महिला आयोगाने यूपी डीजीपीकडे याबाबत पुढील सात दिवसात रिपोर्ट मागितली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()