Viral Video : सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ करत मारहाण, महिलेला अटक

Viral video  Woman arrested for abusing assaulting security guard in Noida society
Viral video Woman arrested for abusing assaulting security guard in Noida society
Updated on

नोएडा : येथील एका पॉश रेसिडेन्शिअल सोसायटीत एका महिलेने सुरक्षा रक्षकाचा शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि त्या महिलेला ताब्यात घेतले. या व्हायरल व्हिडीओमध्ये ती स्त्री गार्डची कॉलर पकडताना दिसत असून, तो गार्ड स्वत:ला सोडवण्याचा प्रयत्न करताना तसेच त्या महिलेला पोलिसांना बोलवायला सांगताना दिसतस आहे.

व्हिडिओमध्ये, सोसायटीचे गेट उघडण्यास उशीर झाल्याच्या क्षुल्लक कारणावरून ही महिला एका गार्डसोबत गैरवर्तन करताना दिसत आहे. व्हिडिओ दोन मिनिटांपेक्षा जास्त आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नोएडा पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. महिलेचा व्हिडिओ नोएडाच्या सेक्टर-126 येथील जेपी ग्रीन विश सोसायटीचा आहे. महिला गार्डचा हात पकडताना दिसत आहे, तर गार्ड महिलेशी अत्यंत संयमाने बोलताना आणि महिलेसमोर विनवणी करताना दिसत आहे.

थोड्या वेळाने, ती स्त्री गार्डला शिवीगाळ आणि अत्यंत असभ्य भाषा बोलू लागते, ज्याचे सहकारी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. ती वारंवार गार्डची कॉलर पकडते. या प्रकारानंतर संबंधित महिला ही मद्यधुंद अवस्थेत होती आणि ती नीट उभी राहू शकत नव्हती, असे मारहाण झालेल्या सुरक्षा रक्षकाने सांगितले. या घटनेने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केल्यानंतर एफआयआर नोंदवण्यात आला.

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी या घटनेचा निषेध केला आणि नोएडा पोलिसांना तिच्यावर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले. त्यांनी ट्वीट करत ही महिली उघडपणे गुंडगिरी आणि शिवीगाळ करत आहे. आ महिलेविरोधत कठोर कारवाई करा असेही त्यांनी म्हटले आहे.या व्हिडीओमध्ये मोठ्या प्रमाणात शिवीगाळ करण्यात आलेली आहे.

श्रीकांत त्यागी नावाचा राजकारणी नोएडामधील सेक्टर 93 मधील ग्रँड ओमॅक्स सोसायटीमध्ये एका महिलेला शिवीगाळ करताना आणि धमकावतानाचा एक व्हिडीओ असाच व्हायरल झाल्यानंतर काही दिवसांनी हा व्हिडिओ समोर आला आहे. श्रीकांत त्यागी च्या व्हिडीओवरून देखील सामान्य नागरिकांनी याबाबत प्रचंड संताप व्यक्त केला होता. त्यानंतर चार दिवस फरार असलेल्या श्रीकांत त्यागी याला पोलिसांनी अटक केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.