पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, राजीनामा देणारे अमरिंदर सिंग हे गेल्या एका आठवड्यातील दुसरे मुख्यमंत्री आहेत. त्याआधी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी 11 सप्टेंबरला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. गुजरातमधील राजकीय भुकंपाची देशभरात चर्चा सुरु असतानाच, 5 दिवसांनंतर म्हणजेच गुरुवारी विराट कोहलीने टी -20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा करून सर्वांनाच मोठा धक्का दिला. राजकारणापासून क्रीडाक्षेत्रातील या राजीनाम्यांनी देशात भूकंप केला आहे.
विजय रुपाणी यांचा राजीनामा
राजीनाम्यांची मालिका विजय रुपाणी यांच्यापासून सुरू केली. त्यांनी 11 सप्टेंबर रोजी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि गुजरातमध्ये खळबळ उडाली. रुपाणी यांनी आपल्या पदाचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या एक वर्षापूर्वीच पद सोडले. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असतानाच त्यांनी घेतलेल्य या निर्णयाने, भाजपमधील अंतर्गत राजकारण समोर आले.
कोहलीनेही दिला राजीनामा
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनेही राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. 16 सप्टेंबर ट्विटरच्या माध्यमातून टी -20 फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आणि क्रिकेट विश्वात खळबळ माजली. टी -20 विश्वचषकापर्यंतच तो संघाचा कर्णधार राहील, असे म्हणत विराटने राजीनामा देणार असल्याचे स्पष्ट केले. महेंद्रसिंग धोनीनंतर 2017 मध्ये विराट कोहलीला टी -20 चे कर्णधार बनवण्यात आलं होतं. तो 4 वर्ष या पदावर राहिला. त्यानं 45 टी -20 मध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले, त्यापैकी 27 सामन्यांत संघाला विजय मिळाला. विराट कोहलीने कर्णधार म्हणून 45 सामन्यांत 1502 धावा आणि अर्धशतकं केली.
पंजाबच्या कॅप्टनने राजीनामा दिला
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर दोन दिवसांनी पंजाबच्या कॅप्टनने अर्थात कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपले पद सोडले. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शनिवारी संध्याकाळी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि काँग्रेसमधील अंतर्गत कलह समोर आले. राज्यपालांकडे राजीनामा सादर केल्यानंतर राजभवनाबाहेरच्या माध्यमांना संबोधित करताना कॅप्टन म्हणाले की, गेल्या काही दिवसांत तिसऱ्यांदा असे घडले आहे. यामुळे त्याला अपमानित वाटू लागते. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनाही याबाबत माहिती दिली होती असे त्यांनी यावेळी सांगितले होते. गेल्या काही महिन्यांपासून पंजाब काँग्रेसमध्ये गोंधळ सुरू होता. प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांचा गट अमरिंदर सिंग यांच्या गटावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत होता.
अमरिंदर सिंग यांच्यासह तीन दिग्गजांनी एकाच आठवड्यात राजीनामा दिला. दरम्यान, या तीन राजीनाम्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री हे देखील राजीनामा देणार असल्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.