मोदी सरकारवर नाराज; टास्क फोर्सच्या प्रमुखांचा राजीनामा

pm modi
pm modi e sakal
Updated on

Virologist Shahid Jameel : भारताला कोरोना महामारीनं विळखा घातला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी केंद्राने आपली तयारी सुरु केली आहे. मात्र, कोरोनाविरोधातील लढा सुरु असतानाच केंद्र सरकारला मोठा झटका बसला आहे. ज्येष्ठ विषाणूशास्त्रज्ञ (Virologist) डॉ. शाहिद जमील यांनी जीनोम सर्विलान्स प्रोजेक्ट (SARS-CoV-2) ग्रुपच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यानंतर केंद्र सरकारने डिसेंबर 2020 मध्ये या सल्लागार ग्रुपची स्थापना केली होती. केंद्र सरकारवरच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत विषाणूशास्त्रज्ञ शाहिद जमील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. डॉ. शाहिद जमील सध्या अशोका विद्यापीठात त्रिवेदी स्कूल ऑफ बायोसायन्सचे संचालक आहेत.

डॉ. शाहिद जमील यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा का दिला, याबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेलं नाही. पण प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, कोरोनाविरोधातील सरकारच्या धोरण आणि तयारीवर ते समाधानी नव्हते. मागील काही दिवसांपासून जमील यांनी उघडपणे सरकारवर निशानाही साधला होता. गेल्या आठवड्यात शाहिद जमील यांनी न्यूयॉर्क टाइम्समध्ये भारतातील कोरोना स्थितीवपर एक लेख लिहिला होता, ज्यात त्यांनी सरकारच्या तयारीवर टीका करत वैज्ञानिकांचा सल्ला ऐकत नसल्याचा आरोप केला होता.

pm modi
या हाहाकारासाठी फक्त मोदी सरकार जबाबदार; 'द लॅन्सेट'ची कडवी टीका

केंद्र सरकारने वैज्ञानिकाचं म्हणणं ऐकावं आणि धोरण बनवण्यासाठी आपली हट्टी वृत्ती सोडावी, असा सल्ला जमील यांनी आपल्या लेखात दिला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()