India-Canada:...तर व्हिसावरील निर्बंध हटवणार; एस जयशंकर यांनी जस्टिन ट्रुडोंना दिली संधी

India-Canada:...तर व्हिसावरील निर्बंध हटवणार; एस जयशंकर यांनी जस्टिन ट्रुडोंना दिली संधी
Updated on

नवी दिल्ली- भारत आणि कॅनडामध्ये तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नागरिकांना व्हिसा देण्यावर निर्बंध आणले होते. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी यासंदर्भात अत्यंत महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे. भारतीय राजदूतांना वियन्ना करारानुसार जर संरक्षण देण्यास कॅनडा तयार असेल तर व्हिसावरील निर्बंध उठवले जाऊ शकतात, असं ते म्हणाले आहेत. (External Affairs Minister S Jaishankar very much to resume the issuing of visas)

भारतीय राजदूतांना कॅनडामध्ये व्हिसा केंद्रावर जाऊन व्हिसा पुरवणे असुरक्षित झाले आहे. त्यामुळे कॅनडामध्ये नागरिकांना व्हिसा देण्याचं बंद करण्यात आल्याचं भारत सरकारकडून सांगण्यात आलं होतं. जयशंकर म्हणाले की, राजदूतांना सुरक्षा पुरवणे हे वियन्ना करातील महत्त्वाची अट आहे. पण, कॅनडातील भारतीय नागरिक आणि राजदूत सुरक्षित नाहीत.

India-Canada:...तर व्हिसावरील निर्बंध हटवणार; एस जयशंकर यांनी जस्टिन ट्रुडोंना दिली संधी
India-Canada: भारत कॅनडा वादामुळे महागाई वाढणार? अशाप्रकारे बिघडू शकते तुमचे आर्थिक गणित

कॅनडाने त्यांच्या सुरक्षिततेबाबत काही प्रगती केली तर आम्ही व्हिसा देण्यास सुरुवात करु शकतो. त्यामुळे कॅनडाने याप्रकरणात गांभीर्याने लक्ष घातलं तर आम्ही लवकरच यावर निर्णय घेऊ, असं जयशंकर म्हणाले आहेत.

जयशंकर पुढे म्हणाले की, भारत आणि कॅनडामधील संबंध तणावाच्या स्थितीतून जात आहेत. पण, मला सांगावसं वाटतंय की या अडचणी कॅनडातील एका विशिष्ठ राजकीय वर्गाशी आणि त्यांच्या नीतीशी आहेत.

खलिस्तानवादी अतिरेकी निज्जर यांची कॅनडामध्ये हत्या झाली होती. त्यांची हत्या भारतीय गुप्तचर यंत्रणेकडून झाल्याचा दावा जस्टिन ट्रुडो यांनी केला होता. त्यानंतर भारत आणि कॅनडामध्ये वादाची ठिणगी पडली. भारताने व्हिसावर निर्बंध आणले. आणि नुकतेच कॅनडाला भारतातील ४१ राजदूत परत बोलवण्यास भाग पाडले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.