लहान मोठ्या निवडणूका जिंकण्यासाठी राजकारणी कोणत्या थराला जातील सांगता येत नाही. जनतेला खोटी आश्वासने देणं वेळ प्रसंगी पैसे वाटणे असे प्रकार झाल्याचं बातम्या पाहायला मिळतात. मात्र उत्तर प्रदेशात स्थानिक स्वराज निवडणूकीत एक अनोखा प्रकार समोर आला आहे. या निवडणूकीत लोकांची चक्क मृत महिलेला निवडून दिलं आहे.
उत्तर प्रदेशच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत हा प्रकार घडला आहे. झालं असं की, २५ वर्षीय आशिया बी यां लोकांसाठी काम करायच्या. त्यांना पुढे देखील लोकांच्या आनंदासाठी काम करण्याची इच्छा होती. समर्थकांनी देखील त्यांच्यावर विश्वास ठेवला इतका विश्वास दाखवला की मतदानाच्या काही दिवस आधी त्यांचा मृत्यू झाला तरी देखील मतदारांना त्यामुळे काहीही फरक पडला नाही.
या निवडणूकीत तरीही मतदारांनी आशिया यांनाच मतदान केलं. आशिया या नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेशातील स्थानिक निवडणूकीत अपक्ष उमेदवार होत्या, मध्येच त्यांची तब्येत झपाट्याने खालावली आणि 20 एप्रिल रोजी फुफ्फुस आणि पोटाच्या आजारामुळे त्यांचा मृत्यू झाला. पण त्याचा निकालावर फारसा परिणाम झाला नाही. मतमोजणी झाली तेव्हा आशिया विजयी झाल्या होत्या.
हसनपूर नगरपालिकेत ३० पेक्षा जास्त वॉर्ड आहेत. आशियाने १६ एप्रिल रोजी हसनपूर नगरपालिका निवडणूकीसाठी अर्ज भरला. या वार्डात जवळपास या पदासाठी 2,000 हून अधिक मते आहेत.
दुखःद बाब म्हणजे गेल्या वर्षीच आशियाशी लग्न केलं होतं. तिचे पती मुंताजीब अहमद हे शहरात दूध डेअरी चालवतात. त्यांनी सांगितलं की, प्रभाग १७ मधील सदस्यपद महिलांसाठी राखीव होते. तिने यापूर्वी कधीही निवडणूक लढवली नसली तरी, तिने राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. लोकांची सेवा करण्यासाठी तिने त्यांच्याशी संपर्क साधला आणि आपल्या शांत स्वभावाने सर्वांचे मन जिंकले.
दुर्दैवाने उपचारादरम्यान आशिया यांचा मृत्यू झाला आणि लोकसेवेचं त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. पण तरीही लोकांनी तिला मतदान केले.निवडणुकीचे निकाल हे तिच्यावर असलेल्या प्रेमाचा पुरावा आहेत.
स्थानिक मतदार देखील आशियाच्या मृत्यूमुळे दुखी झाले आहेत. तसेच अनेक मतदारांनी आशिया यांचा मृत्यून धक्का बसल्याचे सांगतात.
दरम्यान हसनपूरचे उपविभागीय दंडाधिकारी अशोक कुमार म्हणाले की, आशिया या अपक्ष उमेदवार होत्या, अर्ज भरल्यानंतर लगेच त्यांचा मृत्यू झाला. ४ मे रोजी पहिल्या फेरीचे मतदान झाले, ते थांबवणं शक्य नव्हतं. मात्र लोकांनी तिला मतं दिली आणि ती विजेता ठरली . पण आपण प्रक्रिया पाळली पाहिजे. या पदासाठी पुन्हा निवडणूक घेतली जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.