कदंब नौदल तळ टप्पा-२ आणि युद्धनौका टप्पा-२ येथे शत्रू राष्ट्रांना संवेदनशील माहिती पुरविल्याबद्दल अधिकारी आणि स्थानिक कामगारांसह पाच जणांना अलीकडेच अटक केली होती.
बंगळूर : येथील कदंब नौदल तळाजवळ दोन्ही पायांना वेगवेगळ्या रंगातील इंग्रजी अक्षरे आणि अंक लिहिलेला टॅग असलेले गिधाड (Vulture) आढळून आले. त्याच्या मागच्या बाजूला जीपीएस ट्रॅकरही आहे. हे गिधाड शत्रू देशातून हेरगिरीसाठी आले असावे, अशी भीती स्थानिकांना वाटत आहे. जिल्ह्यात कैगा अणुऊर्जा केंद्र (Kaiga Nuclear Power Station) व कदंब नौदल तळ असून, या गिधाडाचे दर्शन घडल्याने अनेक शंका उपस्थित झाल्या आहेत.