नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यात खुशखबर मिळू शकते. कारण, मोदी सरकार १ ऑक्टोबरपासून कामगार संहितेचे नियम (wage Code bill rules) लागू करू शकते. कामगार संहितेच्या नियमांनुसार, कर्मचाऱ्यांना आठवड्यात 3 दिवस रजेचा पर्याय मिळू शकतो. आठवड्यात पाच किंवा सहा दिवसांऐवजी तुम्हाला फक्त 4 दिवस काम करण्याचा लाभ मिळू शकतो. तथापि, यामुळे तुमचे कामाचे तास दिवसातून 9 ते 12 तासांपर्यंत वाढू शकतात.
नवीन कायद्यामध्ये, कामाचे कमाल तास 12 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मात्र, कामगार संघटना 12 तासांच्या नोकरीला विरोध करत आहेत. संहितेच्या नियमांमध्ये, 30 मिनिटांची मोजणी करून ओव्हरटाइममध्ये 15 ते 30 मिनिटांच्या दरम्यान अतिरिक्त काम समाविष्ट करण्याची तरतूद आहे. सध्याच्या नियमानुसार, 30 मिनिटांपेक्षा कमी वेळ ओव्हरटाइमसाठी पात्र मानले जात नाही. नियमांमध्ये कोणत्याही कर्मचाऱ्याला 5 तासांपेक्षा अधिक काळ सतत काम करण्यास मनाई आहे. कर्मचाऱ्यांना दर पाच तासांनी अर्धा तास विश्रांती द्यावी लागेल.
नवीन लेबर कोडमध्ये हा पर्याय नियमांमध्येही ठेवला जाईल, ज्यावर कंपनी आणि कर्मचारी परस्पर संमतीने निर्णय घेऊ शकतात. नवीन नियमांनुसार, कामाच्या तासांची कमाल मर्यादा आठवड्यात 48 तास ठेवण्यात आली आहे, अशा परिस्थितीत कामकाजाचे दिवस 5 वरून 4 पर्यंत कमी केले जाऊ शकतात. आठवड्यात तीन सुट्ट्या असतील.
सरकारला 1 एप्रिल 2021 पासून नवीन कामगार संहितेतील नियमांची अंमलबजावणी करायची होती. परंतु, राज्यांची तयारी न केल्यामुळे आणि कंपन्यांना एचआर धोरण बदलण्यासाठी अधिक वेळ दिल्यामुळे ते पुढे ढकलण्यात आले. कामगार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सरकारला 1 जुलैपासून कामगार संहितेचे नियम अधिसूचित करायचे होते. परंतु, राज्यांनी हे नियम लागू करण्यासाठी अधिक वेळ मागितला. ज्यामुळे ते 1 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आले.
आता कामगार मंत्रालय आणि मोदी सरकारला 1 ऑक्टोबरपर्यंत कामगार संहितेचे नियम अधिसूचित करायचे आहेत. ऑगस्ट 2019 रोजी संसदेने तीन श्रम संहिता, औद्योगिक संबंध, कामाची सुरक्षा, आरोग्य आणि कामकाजाची परिस्थिती आणि सामाजिक सुरक्षा यासंबंधीचे नियम बदलले. हे नियम सप्टेंबर 2020 रोजी पारित करण्यात आले. नवीन मसुद्याच्या नियमानुसार, मूळ वेतन एकूण पगाराच्या 50 टक्के किंवा अधिक असावे. यामुळे बहुतांश कर्मचाऱ्यांची वेतन रचना बदलेल. मूळ वेतनात वाढ झाल्यामुळे, पीएफ आणि ग्रॅच्युइटीसाठी कापलेली रक्कम वाढेल कारण यात शिकलेले पैसे मूळ पगाराच्या प्रमाणात आहेत. असे झाल्यास, तुमच्या घरी येणारा पगार कमी होईल, निवृत्तीनंतर मिळणारे पीएफ आणि ग्रॅच्युइटीचे पैसे वाढतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.