Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

यावेळी मेधा कुलकर्णींनी संबंधीत खासदारानं जाहीर माफी मागावी अशी मागणीही केली.
Medha Kulkarni
Medha Kulkarni
Updated on

नवी दिल्ली : वक्फ बोर्डासंबंधीच्या संयुक्त संसदीय समितीच्या अर्थात जेपीसीच्या बैठकीत आज जोरदार खडाजंगी पाहायला मिळली. यावेळी भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी आणि आपचे खासदार संजय सिंह यांच्यात वाद झाला. यावेळी कुलकर्णी सिंह यांच्यावर संतापल्या. तसंच त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणीही केली.

Medha Kulkarni
Worli Vidhan Sabha: वरळीतून अमित ठाकरे नव्हे तर मनसेच्या 'या' फायरब्रँड नेत्याला मिळणार तिकीट; राज ठाकरे फोडणार प्रचाराचा नारळ

जेपीसीच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकासंदर्भात नेमण्यात आलेल्या JPCच्या बैठकीत चांगलीच खडाजंगी झाली. मेधा कुलकर्णी यांच्या प्रश्नावर संजय सिंह यांनी केलेल्या टिप्पणीनं मेधा कुलकर्णी यांचा संताप झाला. एखादा खासदार बैठकीत अशी आक्षेपार्ह टिप्पणी कशी काय करु शकतो? असा सवाल यावेळी मेधा कुलकर्णी यांनी केला.

Medha Kulkarni
Nandurbar Violence: नंदुरबार शहरात दोन गटात तणाव; दगडफेक अन् जाळपोळीच्या घटना

या प्रकारानंतर संजय सिंह यांनी दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत मेधा कुलकर्णी यांच्याकडं याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली. पण समितीतील सगळ्या सदस्यांसमोर संजय सिंह यांनी माफी मागावी असा आग्रह मेधा कुलकर्णी यांनी धरला.

दरम्यान, संजय सिंह जाहीररित्या माफी मागणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.