Fish : तापमानवाढीने अरबी समुद्रात नव्या माशांची पैदास

अरबी द्वीपकल्प आणि भारतीय उपखंडा दरम्यानच्या पसरलेल्या अरबी समुद्रात जेली फिश, पफर मासे आणि लेदर जॅकेट मासे अशा माशांचे आक्रमण वाढले.
Fish
Fishsakal
Updated on

तिरूअनंतपुरम - अरबी द्वीपकल्प आणि भारतीय उपखंडा दरम्यानच्या पसरलेल्या अरबी समुद्रात जेली फिश, पफर मासे आणि लेदर जॅकेट मासे अशा माशांचे आक्रमण वाढले असल्याने येथे पारंपरिक माशांना धोका उत्पन्न झाला आहे.

सागरी शास्त्रज्ञांच्या मते हिंद महासागराच्या वायव्य भागातील समुद्रातही तापमान वाढत आहे आणि हवामानातही सातत्याने बदल दिसून येत आहे. यामुळे मच्छीमारांच्या उपजिविकेवर परिणाम होत आहे. अरबी समुद्राचे तापमान साधारणपणे २८ अंशपेक्षा सेल्सिअसपेक्षा कमी असते. पण हवामान बदलामुळे तापमान वेगाने वाढत आहे. या कारणामुळे काही अपारंपरिक, बिगर व्यावसायिक प्रजाती आता मत्स्यपालनाचा भाग बनत आहेत, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.

सध्या आपल्या मच्छीमारांच्या जाळ्यात जेली फिश, पफर मासे आणि लेदर जॅकेट माशांची संख्या जास्त आढळते. समाज रचनेत बदल घडून येत आहे, असे कोची येथील केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्थेतील मुख्य शास्त्रज्ञ डॉ. ग्रीनसन जॉर्ज यांनी सांगितले.

मासेमारीत माशांच्या या प्रजातींचा संख्या हळूहळू वाढू लागली आहे, असेही ते म्हणाले. २००७मध्ये नैऋत्य किनाऱ्यावर मासेमारीदरम्यान जेली फिश नगण्य संख्येने जाळ्यात आढळत होते. पण २०२१ पर्यंत १० टनांहून अधिक जेली फिश मच्छीमारांना मिळू लागले आहेत. २००७ ते २०२२ पर्यंत याकाळात २० टन पफर मासे मिळाले तर २००७मध्ये अर्धा टन लेदर जॅकेट मासे मिळाले होते. २०२२पर्यंत हे प्रमाण २५ टनापर्यंत वाढले आहे, असे डॉ.जॉर्ज म्हणाले.

जेव्हा अरबी समुद्राचे तापमान वाढते तेव्हा औष्णिक- क्षारयुक्त अभिसरणाच्या रचनेत बदल घडून येतो. यामुळे पूर्वपार असलेल्या माशांच्या संख्येवर परिणाम होतो. यापैकी काही प्रजाती सुरुवातीला धोकादायक असल्याचे मानले जात होते, पण त्याच्या निर्यात मूल्याची जाणीव मच्छीमारांना होऊ लागली आहे. त्यामुळे हे मासे पकडून त्यांची निर्यात ते करू लागले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

Fish
Aadhaar Card : पायाचे ठसे वापरून बनवलं आधार कार्ड...; टोळीचा कारनामा वाचून सगळेच चक्रावले!

शास्त्रज्ञांचे मत

  • जर समुद्राचे तापमान २८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असेल तर चक्रीवादळासारख्या हवामानविषयक मोठ्या घटनांना सहाय्यक ठरते

  • आतापर्यंत अरबी समुद्राचे तापमान २८ अंशापेक्षा कमी होते. पण आता त्यात एक अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढ झाली आहे

  • अरबी समुद्रात चक्रीवादळे निर्माण होऊन वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण वाढू लागते तेव्हा मासेमारीचे दिवस कमी होत जातात. या परिणाम मॉन्सूनवर होत आहे

  • या सर्व बाबींमुळे भारतीय अर्थव्यवस्थेत मोठी आर्थिक तूट निर्माण होणार आहे

  • एल निनो (समुद्र तापमान चक्र) मजबूत होत असल्याने परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम पॅसिफिक किंवा अटलांटिक महासागरांवर होत नाही तर उत्तर हिंद महासागरावर होत आहे.

  • अरबी समुद्राच्या तापमान वाढीमुळे केवळ मासेमारीची बदल होत नाही तर मासेमारीच्या दिवसांमध्येही घट होत असल्याने मोठा आर्थिक परिणाम होऊ शकतो

  • अरबी समुद्र आता चक्रीवादळांच्या निर्मितीस पोषक ठरत आहेत. अगदी मॉन्सूनच्या तोंडावरही चक्रीवादळे तयार होत आहेत

  • सागराच्या तापमानवाढीमुळे त्यातील पाण्यातील पीएच पातळीतही बदल होत असून पाण्यातील आम्लाचे प्रमाण अधिक वाढते

  • अरबी समुद्रात हानिकारक विषयुक्त शैवालाची मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने तयार होणाऱ्या ‘हार्मफुल अल्गल ब्लूम्स (एचबीए)चे प्रमाणही वाढण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे मासे मृत्यू दरात वाढ झाली आहे

  • ‘एचबीए’मुळे प्रवाळ तुटल्याने माशांच्या पोषक अधिवास कमी होत आहे

हिंद महासागरातील तापमान वाढत आहे. बंगालच्या उपसागरातील तापमान वाढलेले आहे. या समुद्रातील तापमान नेहमीच जास्त असते. त्यामुळे चक्रीवादळाच्या निर्मितीस पोषक वातावरण तेथे असते. पण अरबी समुद्रात तसे नव्हते. दक्षिण आशियायी उपखंडासह हिंद महासागर उत्तरेला जमीन असल्याने जास्तीचा उष्णता बाहेर पडण्यास मार्ग नसल्याने हिंद महासागराचा उत्तर भाग वेगाने गरम होत आहे. यामुळे मॉन्सूनचे वारे कमकुवत पडत असून पाऊस अनियमित पडतो.

- डॉ.रॉक्सी मॅथ्यू कोल, शास्त्रज्ञ, भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()