pm modi
pm modi sakal

PM Modi: पंतप्रधान मोदींवर हल्ल्याची धमकी! भाजपच्या कार्यालयाला मिळालं पत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच केरळच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
Published on

कोची : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ल्यावर धमकी एका पत्राद्वारे देण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. केरळ दौऱ्यादरम्यान मोदींना टार्गेट करण्याचा इशारा या पत्रातून देण्यात आल्याचा दावा केरळचे भाजप प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी केला आहे. पंतप्रधान मोदी केरळातील पहिल्या वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटन कार्यक्रमाला जाणार आहेत. (warning of attack on PM Modi at Kerala visit letter recieved by BJP)

pm modi
Adani Group: गौतम अदानींना मोठा झटका! 400 कोटींचा करार अडकला, काय आहे कारण?

सुरेंद्रन म्हणाले, "PM मोदींवर हल्ल्याचं पत्र कोचीमधील एका व्यक्तीनं मल्याळम भाषेत लिहिलं आहे. हे पत्र एक आठवड्यापूर्वी भाजपच्या कार्यालयाला प्राप्त झालं आहे. हे पत्र पोलीस महासंचालकांकडं सुपूर्द करण्यात आलं आहे"

pm modi
Shivaji Chumbhale : हे तर राजकीय षडयंत्र, आमदारांनी केलेले आरोप तथ्यहीन; माजी सभापती चूंभळे यांचे खंडन

माध्यमांतील रिपोर्टनुसार, "पोलीस अधिकाऱ्यांनी एन. के. जॉनी नावाच्या एका व्यक्तीला ताब्यात घेतलं असून ज्याच्या पत्त्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला होता. या पत्रामध्ये मोदींना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासारखेच उडवण्याची धमकी देण्यात आली होती. जॉनी हा कोचीचा रहिवासी असून आपण हे पत्र लिहिलं नसल्याचं त्यानं म्हटलं आहे"

pm modi
Ramadan Eid : जीव देईन, पण देशाचे तुकडे कधीच होऊ देणार नाही; ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा

जॉनी यानं म्हटलं की, "पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन पत्राबद्दल चौकशी केली. पोलिसांनी या पत्रातील हस्ताक्षराचं माझ्या हस्ताक्षराशी तपासणी करुन पाहिली. त्यानंतर त्यांना लक्षात आलं की त्यानं हे पत्र लिहिलेलं नाही. उलट त्याच्याशी वैर बाळगणारी व्यक्ती या धमकीसाठी जबाबदार असू शकते तसेच पोलिसांना ज्यांच्यावर संशय आहे त्यांची नावं पोलिसांनी उघड करावीत असंही यावेळी म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com