Water Project : दीडशे जल प्रकल्पांची पातळी खालावली; जल आयोगाची माहिती

देशाच्या अनेक भागांत मॉन्सून दाखल झाला असला तरी अजूनही पुरेशा पावसाने हजेरी लावलेली नाही.
water level
water levelsakal
Updated on

नवी दिल्ली - देशाच्या अनेक भागांत मॉन्सून दाखल झाला असला तरी अजूनही पुरेशा पावसाने हजेरी लावलेली नाही. देशातील १५० प्रमुख जल प्रकल्पांतील पाणीसाठा एकूण जिवंत साठ्यापैकी २० टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. गेल्या दोन आठवड्यांपूर्वी हा साठा २१ टक्के तर त्यापूर्वीच्या आठवड्यात २२ टक्के इतका होता. केंद्रीय जल आयोगाने (सीडब्लूसी) ही आकडेवारी जाहीर केली आहे.

आयोगाच्या निवेदनात म्हटले आहे, की देशातील १५० प्रमुख जल प्रकल्पांतील सध्याचा जलसाठा ३६.३६८ अब्ज घनफूट आहे. गेल्या वर्षी याच काळात तो ४६.३६९ अब्ज घनफूट इतका होता. सध्या या प्रकल्पांत ४२.६४५ अब्ज घनफूट या सरासरी पातळीपेक्षाही कमी पाणी आहे.

हिमाचल प्रदेश, पंजाब आणि राजस्थान या राज्यांतील जल प्रकल्पांसह देशाच्या ईशान्येकडील एकूण १० जल प्रकल्पांची एकूण क्षमता १९.६६३ अब्ज घनफूट आहे. मात्र, सध्या या प्रकल्पांत २७ टक्केच म्हणजे ५,२३९ अब्ज घनफूट जलसाठा आहे.

पूर्व भागात असलेल्या आसाम, झारखंड, ओडशा, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, नागालॅंड आणि बिहार या राज्यांतील २३ जल प्रकल्पांची एकूण क्षमता २०.४३० अब्ज घनफूट असून सध्या प्रकल्पांत एकूण क्षमतेच्या केवळ १७.८३ टक्के म्हणजे ३,६४३ अब्ज घनफूट जलसाठा आहे.

देशाच्या पश्चिम भागात महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड आदी राज्यांतील २६ जल प्रकल्पांची क्षमता ४८,२२७ अब्ज घनफूट असून सध्या ११,६९३ अब्ज घनफूट पाणी आहे. हा जलसाठा एकूण क्षमतेच्या केवळ २४ टक्के आहे.

दक्षिणेकडेही फारशी वेगळी स्थिती नसून आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, केरळ व तमिळनाडूतील ४२ प्रमुख जल प्रकल्पांची एकूण क्षमता ५३,३३४ अब्ज घनफूट असून सध्या केवळ ८,३२२ अब्ज घनफूट म्हणजे १६ टक्के जलसाठा आहे.

नर्मदेत अधिक, कावेरीत कमी

साबरमती, तापी, नर्मदा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या खोऱ्यांत सरासरीपेक्षा अधिक साठा असून गंगा, सिंधू, माही आणि गोदावरी नद्यांच्या खोऱ्यात जवळपास सरासरीइतका जलसाठा आहे. मात्र, कृष्णा, ब्राह्मणी, कावेरी आदी नद्यांच्या खोऱ्यात सध्या पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य आहे.

  • सध्याचा जलसाठा - ३६.३६८ अब्ज घनफूट

  • जिवंत जलसाठ्याची क्षमता - १७८.७८४अब्ज घनफूट

  • गेल्या वर्षीचा जलसाठा - ४६.३६९ अब्ज घनफूट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.