Wayanad Landslide: देशावर अस्मानी संकट! वायनाडनंतर हिमाचलमध्ये 47 लोक बेपत्ता; जाणून घ्या पावसामुळे कुठं काय घडलं?

Himachal Pradesh Cloud Burst: सहा शाळा पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेल्या आहेत. यापैकी एक शाळा शिमला आणि कुल्लूच्या सीमावर्ती गावातील होती, तिथले आठ विद्यार्थी बेपत्ता आहेत.
Himachal Pradesh Cloud Burst
Himachal Pradesh Cloud BurstEsakal
Updated on

गेल्या आठवड्यात वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनामुळे सुमारे 300 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यानंतर देशातील अनेक भागांत पूर आणि ढगफुटीमुळे मोठं सकट निर्माण झाले आहे.

ढगफुटीमुळे आणि पुरामुळे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हिमाचल प्रदेशात 47 लोक अजूनही बेपत्ता आहेत. शुक्रवारी दोन मुलांचे मृतदेह सापडल्याने मृतांची संख्या सात झाली आहे.

बचावकार्यात गुंतलेल्या एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस आणि होमगार्ड यांना स्थानिक लोक मदत करत आहेत. केंद्र सरकारने पाठवलेले चिनूक आणि MI-17 हे विमानही उत्तराखंडमधील बचाव कार्यात सामील झाले आहेत.

केदारनाथमध्ये 700 हून अधिक यात्रेकरू अडकले

केदारनाथमध्ये दरड कोसळल्यानंतर तिसऱ्या दिवशीही 150 लोक नातेवाईकांशी संपर्क करू शकलेले नाहीत, ही चिंतेची बाब आहे. शुक्रवारी आणखी 2,744 यात्रेकरूंना बाहेर काढण्यात आले, परंतु 700 हून अधिक लोक अजूनही धाममध्ये अडकले आहेत.

हिमाचलमध्ये, हवामान खात्याने लाहौल स्पिती, किन्नौर आणि सिरमौर वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये 3 आणि 4 ऑगस्ट आणि त्यानंतर 7 आणि 8 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Himachal Pradesh Cloud Burst
Delhi Coaching Centre : कोचिंग सेंटर दुर्घटनेचा तपास ‘सीबीआय’कडे ; पोलिस, महापालिकेवरही दिल्ली उच्च न्यायालयाचे ताशेरे

शाळा गेल्या वाहून

कुल्लूमधील सहा शाळा पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेल्या आहेत. यापैकी एक शाळा शिमला आणि कुल्लूच्या सीमावर्ती गावातील होती, तिथले आठ विद्यार्थी बेपत्ता आहेत.

याशिवाय शिमल्यातील एक रुग्णालयही वाहून गेले आहे. यावेळी गावातील लोकांवर येथे उपचार सुरू होते.

याशिवाय 17 वाहने अपघाताचे बळी ठरली आहेत, तर तीन मत्स्यपालन केंद्रेही पुराचा तडाखा बसून उद्ध्वस्त झाली आहेत.

Himachal Pradesh Cloud Burst
Neet Exam Scam : पेपरफुटी केवळ दोन जिल्ह्यांपुरती ; ‘नीट-यूजी’ची फेरपरीक्षा नाहीच; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

यापूर्वी हिमाचल प्रदेश आणि शेजारच्या उत्तराखंडमध्ये ढगफुटीच्या घटनांमध्ये किमान 14 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता आहेत. दोन्ही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून आपत्तींमुळे बेपत्ता झालेल्या लोकांना शोधण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.

दोन्ही राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, बचावकार्य सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

उत्तराखंडमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला, त्यापैकी तिहरीमध्ये तीन, हरिद्वार, डेहराडून आणि रुरकीमध्ये प्रत्येकी दोन आणि चमोलीत एकाचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.