केरळच्या वायनाड जिल्ह्यात भूस्खलनामुळे उद्ध्वस्त झालेल्या गावांतील रहिवाशांना घरे सोडून पळून जावे लागले. मात्र आता त्यांना नव्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. भूस्खलनग्रस्तांनी त्यांच्या घरातून चोऱ्या झाल्याच्या तक्रारी पोलिसांकडे केल्या आहेत. यानंतर पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली आहे.
चोरीच्या उद्देशाने रात्रीच्या वेळी परिसरात प्रवेश करणाऱ्यांना पकडून त्यांना शिक्षा करण्याची मागणी काही बाधितांनी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
एका पीडित व्यक्तीने सांगितले की, या दुर्घटनेत आम्ही सर्वस्व गमावलेले लोक आहोत. भूस्खलनाच्या दुर्घटनेच्या वेळी सुरक्षेसाठी आम्ही आमचे घर सोडले होते. मात्र त्यानंतर आम्ही आमच्या घराची स्थिती पाहण्यासाठी परत आलो असता दरवाजे तुटलेले आढळून आले. त्यांच्या खोलीतून चोरट्यांनी कपडे चोरल्याची तक्रार त्यांनी केली.
चुरलमाला आणि मुंडक्काईसह आपत्तीग्रस्त भागात पोलिसांची गस्त सुरू करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी एका निवेदनात सांगितले. रात्रीच्या वेळी बाधित भागात किंवा बाधितांच्या घरात विनापरवाना घुसणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.
पुढे म्हणाले की, बचाव कार्याच्या नावाखाली किंवा अन्यथा, रात्रीच्या वेळी पोलिसांच्या परवानगीशिवाय कोणालाही बाधित भागात किंवा घरात प्रवेश करण्यास परवानगी नाही.
मंगळवारी झालेल्या भूस्खलनानंतर वायनाडमध्ये गेल्या पाच दिवसांपासून विविध बचाव पथकांद्वारे बचाव कार्य सुरू आहे. यामध्ये अद्याप 200 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. तर मृतांची संख्या 350 वर गेली आहे. बचाव पथकांनी रविवारी सकाळी बचाव कार्याला सुरूवात केली आहे.
वायनाडमधील भूस्खलनग्रस्त मुंडक्काई आणि चूरलमला येथे बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध सुरू असताना, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितले की, "अंतराळ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केवळ गाळाची विशिष्ट खोली मोजणे शक्य आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना शोधण्यासाठी त्यावर अवलंबून राहू शकत नाही."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.