Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्व सरमा यांनी खर्गे यांचा खोलीत डोकावतानाचा ४७ सेकंदाचा व्हिडिओ शेअर करत गांधी कुटुंबीयांवर निशाणा साधला होता. त्याला काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे.
Mallikarjun Kharge, Priyanka Gandhi and Rahul gandhi
Mallikarjun Kharge, Priyanka Gandhi and Rahul gandhisakal
Updated on

नवी दिल्ली - काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी-वद्रा या वायनाडमध्ये उमेदवारी अर्ज भरत असताना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्ल्किार्जुन खर्गे हे खोलीबाहेरून आत डोकावत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप नेत्यांनी गांधी कुटुंबीयांवर टीका केली होती. मात्र, बनावट बातम्या पसरविण्यात भाजप पटाईत असून हा पक्ष पुन्हा खोटे बोलला आहे, अशी टीका करत, प्रियांका अर्ज भरताना खर्गे हे त्यांच्यासोबत बसले असल्याचे छायाचित्र प्रसिद्ध करत काँग्रेसने भाजपला प्रत्युत्तर दिले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.