WB Panchayat Elections
WB Panchayat ElectionseSakal

WB Panchayat Elections : मतदान सुरू असताना थेट बॅलेट बॉक्स घेऊन व्यक्ती फरार; बंगालमधील प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल

बंगालमधील या मतदानादरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसाचार पहायला मिळत आहे.
Published on

पश्चिम बंगालमध्ये आज (शनिवार) पंचायत निवडणुकांसाठी मतदान सुरू आहे. या निवडणुकांच्या प्रचारावेळी काही प्रमाणात हिंसाचार पहायला मिळाला होता. मात्र मतदानाच्या दिवशी जे झालं ते पाहून या देशात चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित होईल.

बंगालमधील या मतदानादरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसाचार पहायला मिळत आहे. मुर्शिदाबादमध्ये एक बूथच जमावाने ताब्यात घेतला आहे, तर कूचबिहारमध्ये एक व्यक्ती बॅलेट बॉक्सच घेऊन पळताना दिसत आहे. या तरुणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

लोकांच्या प्रतिक्रिया

ट्विटरवर शेअर झालेल्या या व्हिडिओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. "इव्हीएम नसतील तर मतदानाला हेच होणार आहे" असं एका यूजरने म्हटलं आहे. तर, "ही लोकशाही नसून, डेमो-क्रेझी" असल्याचं आणखी एका ट्विटर यूजरने म्हटलंय.

WB Panchayat Elections
Brain Eating Amoeba : मेंदू खाणाऱ्या अमिबाचा भारतात बळी; केरळमध्ये १५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू! नाकावाटे गेला शरीरात

११ जणांचा मृत्यू

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या हिंसेत शुक्रवार रात्रीपासून सुमारे ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मुर्शिदाबाद (३) आणि कूचबिहार (२) या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. याव्यतिरिक्त मालदा, उत्तर २४ परगणा, पूर्वी बर्दवान या जिल्ह्यांमध्ये देखील प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे.

बॅलेट बॉक्समध्ये पाणी

पूर्वी बर्दवान जिल्ह्यामध्ये बरविटा प्रायमरी स्कूलमध्ये असलेल्या मतदान केंद्रावर काही समाजकंटकांनी तोडफोड केली. याठिकाणी ड्यूटीवर असणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, की रात्री दोनच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी बॅलेट बॉक्समध्ये पाणी टाकलं. तर, आज सकाळी देखील काही व्यक्तींनी तोडफोड केली.

WB Panchayat Elections
USA on Manipur Violence: मणिपूर हिंसाचारात अमेरिकेकडून हस्तक्षेपाची तयारी; काँग्रेसकडून केंद्रावर हल्लाबोल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.