नवी दिल्ली : कोलकत्यामधील आर. जी कर हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर पश्चिम बंगालमध्ये महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा तापला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून राज्यात अतिरिक्त जलदगती न्यायालय (फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट) स्थापन करण्याचे आवाहन केले आहे.