Rajiv Gandhi Birth Anniversary : इंदिरा, राजीव गांधींची हत्या झाली, तेव्हा आमचं कुटुंब..; काय म्हणाली होती दोषी नलिनी?

'राजीव गांधींच्या हत्येत माझं नाव होतं, हे मी मान्य करू शकत नाही.'
Rajiv Gandhi Birth Anniversary
Rajiv Gandhi Birth Anniversary esakal
Updated on
Summary

'राजीव गांधींच्या हत्येत माझं नाव होतं, हे मी मान्य करू शकत नाही.'

राजीव गांधी (Rajiv Gandhi) हत्येप्रकरणी दोषी ठरल्यानंतर तीन दशकांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेल्या नलिनी श्रीहरन (Nalini Sriharan) यांनी सुटकेनंतर, स्वत:ला काँग्रेस कुटुंबातील (Congress Family) सदस्य असल्याचं म्हटलं होतं.

नलिनी श्रीहरन या सहा दोषींपैकी एक आहेत. त्यांना सर्वोच्च न्यायालयानं निर्दोष मुक्त केलं होतं. सहाही दोषींनी जवळपास तीन दशकं तुरुंगात काढली आहेत. नलिनी म्हणाली, "काही लोक आमच्या सुटकेला विरोध करत आहेत. पण, आम्ही काँग्रेस परिवार आहोत. जेव्हा इंदिरा गांधी (Indira Gandhi) आणि राजीव गांधी यांची हत्या झाली. तेव्हा आमचं कुटुंब दु:खी होतं आणि त्यावेळी आम्ही घरी जेवणही केलं नाही. राजीव गांधींच्या हत्येत माझं नाव होतं, हे मी मान्य करू शकत नाही. मी त्या दोषातून मुक्त व्हावं. त्यांची हत्या कोणी केली हे आम्हाला माहीत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

Rajiv Gandhi Birth Anniversary
सर्वजण आता जास्त शहाणे झालेत, देवानं त्यांना रातोरात अक्कल दिलीय; पटेलांचा बावनकुळेंवर घणाघात

त्रिची विशेष शिबिरात उपस्थित असलेल्या चार श्रीलंकन ​​नागरिकांनाही सोडण्यात यावं, असं आवाहनही त्यांनी केलं. नलिनी म्हणाल्या होत्या, “मी राज्य आणि केंद्र सरकारांना माझ्या पतीसह त्रिची विशेष शिबिरात बंद असलेल्या चार श्रीलंकन ​​नागरिकांची सुटका करण्याचं आवाहन करते. त्यांची तुरुंगातून सुटका झाली असली तरी त्रिची विशेष शिबिर तुरुंगासारखं आहे.

Rajiv Gandhi Birth Anniversary
Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, श्रीलंकन ​​नागरिकांना वेल्लोर तुरुंगातून सोडल्यानंतर संध्याकाळी त्रिची जिल्ह्यातील एका विशेष निर्वासित शिबिरात नेण्यात आलं होतं. दरम्यान, तामिळनाडूच्या एका सरकारी अधिकाऱ्यानं सांगितलं होतं की, नुकतीच सुटका करण्यात आलेल्या चार श्रीलंकन ​​नागरिकांना हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी श्रीलंकेचे नागरिक दोषी आढळले होते. त्यानंतर सर्व दोषींना पुनर्वसन शिबिरात ठेवण्यात आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.