सध्या आपण भविष्यातील वादांचे ट्रेलर्स पाहतोय; लष्कर प्रमुखांचा गंभीर इशारा

चीन-पाकिस्तान सीमेवरील लष्करी सज्जतेचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते.
General Manoj Naravane
General Manoj NaravaneANI
Updated on

नवी दिल्ली : चिनी सैन्यासोबत सुरु असलेल्या लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताचे टॉपचे लष्करी अधिकारी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे (Manoj Narawane) यांनी एक गंभीर इशारा दिला आहे. भारत सध्या भविष्यातील वादांसंदर्भात ट्रेलर अनुभवत आहे. चीन-पाकिस्तान सीमेवरील (China-Pak Border) लष्करी सज्जतेचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. (We are currently watching trailers of future disputes Serious warning from army chief Naravane)

General Manoj Naravane
अँटीलिया प्रकरणाचं गूढ उकलणार? एटीएसने चांदिवाल आयोगाकडे दिला रिपोर्ट

भारतासमोरील आव्हानांबाबत बोलताना लष्करप्रमुख नरवणे यांनी पाकिस्तान आणि चीनचे नाव न घेता म्हटलं की, आपले शत्रू त्यांची धोरणात्मक उद्दिष्टं साध्य करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि आपण भविष्यातील संघर्षांचे ट्रेलर पाहत आहोत. भारत सध्या आपल्या सैन्य दलांची पुर्नरचना, संतुलन आणि पुन्हा दिशा देण्यावर भर देत आहे. तसेच थिएटरायझेशनद्वारे तीन्ही सेवांच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया कालबद्ध पद्धतीनं आधीच पुढे जात आहे"

General Manoj Naravane
वसई : नातेवाईकांपासून महिलांना धोका; तब्बल २९२ बलात्काराच्या घटना

भारत आणि चीन आता जवळजवळ दोन वर्षांपासून लष्करी अडथळ्यात गुंतले आहेत आणि चर्चेच्या अनेक फेऱ्या असूनही बीजिंगने हॉट स्प्रिंग्स व्यतिरिक्त डेपसांग, डेमचोकसह उर्वरित वादाच्या बिंदूंपासून मुक्त होण्यास नकार दिला आहे.

दरम्यान, गेल्याच महिन्यात लष्कर प्रमुख म्हणाले होते की भारतीय सैन्य देशाच्या सीमेवर एकतर्फी परिस्थिती बदलण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.