Goa: TMCसोबत युती होणार का? काँग्रेस म्हणतं, 'त्यांचा दृष्टीकोन अत्यंत...'

rahul gandhi is just a kid says Mamata Banerjee
rahul gandhi is just a kid says Mamata Banerjee
Updated on

पणजी: देशातील पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. त्यामुळे एकूणच देशातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. गोव्यामध्ये (Goa Assembly Election 2022) चाळीस जागांवर विधानसभेची निवडणूक होत आहे. अत्यंत छोट्या अशा या राज्यामध्ये सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली मोठ्या प्रमाणावर वाढल्या असून भाजप, काँग्रेस, आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस असे राष्ट्रीय पक्षही यासाठी शर्यतीत उतरले आहेत.

rahul gandhi is just a kid says Mamata Banerjee
सुनेला 'स्ट्राइक' देण्याच्या प्रयत्नात सासऱ्याच्या मंत्रीपदाची 'विकेट'
rahul gandhi is just a kid says Mamata Banerjee
आसाम : कारबी अँगलाँगमध्ये १० कोटींचं हेरॉईन जप्त ; दोघांना अटक

या निवडणुकीमध्ये कोणाची कोणाशी कशी युती होणार आहे, हे पाहणं निर्णायक ठरणार आहे. दरम्यान, पश्चिम बंगालनंतर गोव्यात आपलं नशीब आजमावू पाहणारा तृणमूल काँग्रेस हा पक्ष काँग्रेससोबत युती करणार का? असा सवाल सातत्याने विचारला जात होता. मात्र, आता त्याबाबत काँग्रेसनेच स्पष्टीकरण दिलं आहे.

ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे गोवा प्रमुख दिनेश गुंडू राव यांनी म्हटलंय की, गोव्यात स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस हा एकमेव पर्याय आहे. गोव्यात तृणमूल काँग्रेसचा दृष्टीकोन अत्यंत खराब आहे आणि त्यांचा उद्देशही चुकीचा आहे. गोव्यातील जनता तृणमूल काँग्रेसला निवडणुकीत नाकारणार आहे. आम्ही त्यांच्यासोबत कोणतीही युती करत नाही आहोत.

rahul gandhi is just a kid says Mamata Banerjee
पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक : प्रकरणाची चौकशी करणाऱ्या माजी न्यायमूर्तींना धमक्या

याआधी शरद पवार यांनी देखील याबाबत भाष्य करताना म्हटलं होतं की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गोव्यात देखील निवडणूक लढणार आहे. गोव्यात परिवर्तन करण्याची गरज आहे. तिथून भाजपची हकालपट्टी करायची आहे. गोव्यामध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेससोबत एकत्र लढण्याच्या विचारात आहोत, असं पवार म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.