Maharashtra Politics: पवारांसोबतच्या बैठकीनंतर काँग्रेसचे सूर बदलले, राहुल गांधी म्हणाले...

शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर आता राहुल गांधी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार
Rahul Gandhi
Rahul GandhiSakal
Updated on

राजकीय वर्तुळात लोकसभा निवडणूक 2024 ची तयारी विरोधी आणि सत्ताधारी पक्षांकडून जोरदार सुरू आहे. अशातच काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेतल्याने राजकीय घडामोडींनी वेग आला आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी केलेलं विधान पाहून पवरांसोबतच्या बैठकीनंतर काँग्रेसचे सूर बदलले अशी नवी चर्चा रंगली आहे. (We Are United Rahul Gandhi Meets Sharad Pawar On Opposition Unity Maharashtra Politics )

कालच्या बैठकीनंतर राहुल गांधी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आम्ही सर्व एक आहोत, असं मोठं विधान राहुल गांधी यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाणं आलं आहे.

Rahul Gandhi
Sharad pawar: राहुल गांधींबरोबरच्या बैठकीनंतर शरद पवारांचं मोठं विधान; राजकीय घडामोडींना वेग

राहुल गांधी उद्धव ठाकरेंचीही घेणार भेट

शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर आता राहुल गांधी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. राहुल गांधी लवकरच मातोश्रीवर येण्याची शक्यता आहे. लवकरच राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची भेट घडणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात या नेत्यांमध्ये चर्चा होईल अशी माहिती आहे. पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांची भेट होणार आहे. सावरकर वादानंतर काँग्रेसकडुन एक प्रकारे डैमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न आहे का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Rahul Gandhi
Rahul Gandhi: राहुल गांधींच्या अडचणीत वाढ! पुण्यात मानहानीचा खटला दाखल; काय आहे प्रकरण?

गेल्या काही दिवसांपासून सावरकरांसंदर्भात सुरु असलेला वाद निवळला आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर देशासह राज्यभरात वाद पेटला होता. त्याचदरम्यान, शरद पवारांनी वेगळी भूमिका घेतली.

Rahul Gandhi
Sharad Pawar: राष्ट्रवादी होणार दिल्लीत बेघर? केंद्र सरकार देणार आणखी एक झटका

त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासाठी अडचणीच्या ठरणाऱ्या विषयांवर काँग्रेसच्या आघाडीच्या नेत्यांनी सातत्याने टीका करणे टाळले पाहिजे, असा स्पष्ट सल्ला पवार यांनी गांधी कुटुंबीयांना दिल्याचे समजते. पवारांच्या त्या सल्ल्यानंतरच राहुल गांधी यांनी, ‘यापुढे आपण सावरकर यांच्याबाबत वक्तव्य करणार नाही,’ असे म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले.

हे सर्व पाहता राजकीय वर्तुळात पवारांसोबतच्या बैठकीनंतर काँग्रेसचे सूर बदलले या चर्चेने जोर धरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.