आम्ही देशाला जातीय द्वेषाच्या आगीत सोडू शकत नाही-शाही इमाम सय्यद अहमद बुखारी

रामनवमी व हनुमान जयंतीला हिंसाचार उफाळून आला
आम्ही देशाला जातीय द्वेषाच्या आगीत सोडू शकत नाही-शाही इमाम सय्यद अहमद बुखारी
आम्ही देशाला जातीय द्वेषाच्या आगीत सोडू शकत नाही-शाही इमाम सय्यद अहमद बुखारीsakal
Updated on

नवी दिल्ली : आम्ही देशाला जातीय द्वेषाच्या आगीत सोडू शकत नाही.मुस्लिम तरूण व नागरिक सध्या भयभीत असून हे वातावरण निवळण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना पत्रे लिहीली आहेत. शहा यांची लवकरच भेट घेण्याचा प्रयत्न करत आहे असे दिल्लीच्या एेतिहासिक जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी आज प्रतिपादन केले.

रमजान महिन्यातील अखेरच्या शुक्रवारच्या नमाजावेळी (अलविदा रमजान) जामा मशिदीत दुपारच्या नमाजासाठी जमलेल्या लाखो मुस्लिम बांधवांना संबोधित करताना बुखारी यांनी सध्याच्या जातीय तणावाच्या परिस्थितीबद्दल केंद्र सरकारकडे बोट दाखविले. त्याचवेळी त्यांनी धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या कांग्रेस, सपा आदी पक्षांनीही 50-60 वर्षात मुस्लिमांचे फार काही भले केले नसल्याचा ठपका ठेवला. भिवंडी , मुरादाबाद, मेरठ, अलीगड येथील दंगलीवेळी दिल्ली व संबंधित राज्यांत हेच पक्ष सत्तेवर होते व त्यांनी मुसलमानांना दंगलीत होरपळताना एकटे सोडले असाही त्यांनी आरोप केला.

इमाम बुखारी म्हणाले की भारतात हिंदू व मुसलमान अनेक शतकांपासून एकमेकांचे सण व उत्सव शांततेत व एकोप्याने साजरे करत आले आहेत. याच वर्षी रामनवमी व हनुमान जयंतीला हिंसाचार करा उफाळून आला. यामागे कोणाचे कारस्तान आहे. सरकारला हे शोधणे कठीण नाही, प्रश्न इच्छाशक्तीचा आहे. दोन धर्मांत फूट पाडण्याचा शत्रूचा हा प्रयत्न हिंंदू-मुसलमान नागरिक एकत्रितपणे हाणून पाडतील असा विश्वास बुखारी यांनी व्यक्त केला. मुस्लिमम समाजातील भितीचे वातावरण तातडीने संपुष्टात येणे गरजेचे आहे. हे वातावरण असेच चालू राहिले तर परिस्थिती स्फोटक बनू शकते व त्याची जबाबदारी सरकारवर असेल असाही इशारा त्यांनी दिला. मोदी व शहा हे साऱया देशाचे नेतृत्व करतात. ते केवळ हिंदूंचे किंवा मुसलमानांचे नेते नाहीत. सध्याच्या हिंसेच्या वातावरणात त्यांनीच मुसलमान समाजाला आश्वस्त करण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे असे सांगून बुखारी म्हणाले की या देशाची लोकशाही , धर्मनिरपेक्षता, हिंदु-मुस्लिम सलोखा हे कायम ठेवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरूच राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.