पणजी - गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मायकल लोबो यांच्यासह पाच आमदार नॉट रिचेबल आहेत. हे आमदार भाजपमध्ये जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे. या घडामोडींदरम्यान काँग्रेसकडून मायकेल लोबो यांची गोवा विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर सोनिया गांधी यांनी गोव्यातील परिस्थिती हातळण्यासाठी मुकूल वासनिक यांना गोव्यात जाण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यातच आता गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची प्रतिक्रिया आली आहे. (Goa Gongress MLA news in Marathi)
प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) म्हणाले की, आम्हाला कोणाचीही गरज नसून आमच्याकडे 25 आमदारांच्या पाठिंब्याचे स्थिर सरकार आहे. काँग्रेसला आता करण्यासारखं काही नाही. त्यामुळे त्यांच्याकडून वेगवेगळे आरोप करण्यात येत असल्याचा दावा सावंत यांनी केला.
दरम्यान काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव म्हणाले, पक्षाचे पाच आमदार लोबो, कामत, केदार नाईक, राजेश फळदेसाई आणि डेलियाला लोबो यांच्याशी संपर्क झालेला नाही. एल्टन डी कोस्टा, संकल्प आमोणकर, युरी आलेमाओ, कार्लोस अल्वारेस फरेरा, रुडॉल्फ फर्नांडिस हे पाच आमदार कॉंग्रेससोबत आहेत. तर सहावे आमदार अलेक्सो सिक्वेरा हे पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात असून ते काँग्रेससोबत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.