तडजोड नाहीच; सीमावादावर आसामचा मिझोरामला इशारा

तडजोड नाहीच; सीमावादावर आसामचा मिझोरामला इशारा
Updated on
Summary

दोन्ही राज्यात काँग्रेसचं सरकार असतानाही इथं वाद होता. हा वाद दोन राज्यांमधला आहे, दोन राजकीय पक्षांमधला नाही असं आसामचे मुख्यंमंत्री म्हणाले.

नवी दिल्ली - आसाम आणि मिझोराम यांच्यातील सीमावादाचे संघर्षात रुपांतर झाले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी मिझोरामला जमीन देणार नाही, कोणत्याही पद्धतीची तडोजड करण्यास तयार नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं आहे. सोमवारी रात्री दोन्ही राज्यांच्या सीमेवर संघर्ष झाला. यामध्ये आसाम पोलिसाती 5 जणांसह एका नागरिकाचा मृत्यू झाला. सरमा यांनी मंगळवारी या संघर्षात प्राण गमावलेल्या पोलिसांना श्रद्धांजली वाहिली. तसंच मृतांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये देण्याची घोषणासुद्धा केली.

सिलचर इथं बोलताना मुख्यमंत्री सरमा म्हणाले की, आसामची इंचभर जमीनही सोडणार नाही. सीमेवर तैनात असलेल्या सर्व जवानांना एक महिन्याचं वेतन अतिरिक्त देण्यात येईल. मी मेघालयच्या मुख्यमंत्र्यांसोबत सहावेळा चर्चा केली. विकासासाठी अशा प्रकारचे प्रश्न सोडवले पाहिजेत. ज्यावेळी गोळीबार सुरु झाला त्याचवेळी मेघालयाच्या मुख्यमंत्र्यांना नियंत्रणाबाबत सांगितलं होतं असंही त्यांनी स्पष्ट केलं.

तडजोड नाहीच; सीमावादावर आसामचा मिझोरामला इशारा
ऑगस्टमध्ये लहानग्यांसाठी उपलब्ध होणार लस; आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

सीमेवर सुरु असलेला संघर्ष हा दोन राज्यांमधील सीमा वाद आहे. हा काही राजकीय मुद्दा नाही. दोन्ही राज्यात काँग्रेसचं सरकार असतानाही इथं वाद होता. हा वाद दोन राज्यांमधला आहे, दोन राजकीय पक्षांमधला नाही असं आसामचे मुख्यंमंत्री म्हणाले.

वाद जिथं सुरु आहे ते राखीव जंगल आहे. राखीव जंगलाबाबत तडजोड होऊ शकते का? हा जमीनीसाठीचा वाद नसून जंगलाचा प्रश्न आहे. आसाम जंगल वाचवण्याच्या बाजूने आहे. त्यात आम्ही कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही असंही आसामच्या मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितलं आहे.

आसाम सरकारने पाच पोलिस आणि एका नागरीकाच्या मृत्यूनंतर राज्यात मंगळवारपासून तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या कालावधीत राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल. तसंच कोणत्याही प्रकारचा सार्वजनिक कार्यक्रम होणार नाही.

तडजोड नाहीच; सीमावादावर आसामचा मिझोरामला इशारा
गरीबीमुळे भीक मागणाऱ्यांना रोखू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचं ठाम म्हणणं

सरमा यांनी म्हटलं होतं की, आम्ही चर्चा केली असून नव्या चौक्यांशी संबंधित प्रश्न सोडवण्याचं आवाहन केलं होतं. 30 मिनिटांच्या गोळीबारावेळी एलएमजीचा वापर केला गेला. आपल्याला हे ठरवायला हवं की भविष्यातील पिढीसाठी आसाम मिझोराममधील जंगली भाग कसा शिल्लक राहील. सॅटेलाइटच्या फोटोमध्ये मिझोरामने काही भागात वस्त्या उभारल्याचं दिसतं. या राखीव जंगलाचं संरक्षण करण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.