Covid-19 Update : सर्वोच्च न्यायालय भीतीच्या छायेखाली; तात्काळ मास्कसक्ती अन् सोशल डिस्टन्सिंगचे आदेश

कोरोनाची कमी आलेली आकडेवारी अचानक वाढू लागली आहे.
supreme court
supreme courtsupreme court
Updated on

देशामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. ही वाढ पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्वोच्च न्यायालयानेही खबरदारी घेतली आहे.

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने आता परिसरात मास्क घालणे, शारिरीक अंतर राखणे आणि स्वच्छतेचं पालन करणे अनिवार्य केलं आहे. तात्काळ या नव्या नियमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

दरम्यान, वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता केंद्राने सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली आहे. तसंच परिस्थितीवर नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला असून आरोग्य यंत्रणांचे मॉक ड्रील्सही घेण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.