Weather Update: देशभरात थंडीचा कडाका! तर 'या' राज्यात पावसाची शक्यता; महाराष्ट्रातील काय परिस्थिती?

Weather Update: दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पुढील 3 ते 4 दिवस कडाक्याच्या थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
Weather Update
Weather UpdateEsakal
Updated on

दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पुढील 3 ते 4 दिवस कडाक्याच्या थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. वाढत्या थंडीसोबतच हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 21 आणि 22 जानेवारी रोजी दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहारसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता आहे. याशिवाय पुढील २४ तासांत हलका पाऊस पडू शकतो.

हवामान विभागाने आज, रविवारी (२१ जानेवारी) दिल्ली-एनसीआरमध्ये दाट धुक्यांमुळे ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. धुक्यामुळे वाहतूक सेवांवर सातत्याने परिणाम होत आहे. शनिवारी 11 ट्रेन उशिराने धावल्या आणि त्याचा परिणाम विमान उड्डाणांवरही दिसून आला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज दिल्लीत कमाल तापमान 18 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 9 अंश राहण्याची शक्यता आहे.

Weather Update
Ayodhya Ram Mandir : अयोध्येसह अवघा देश झाला राममय; पाचव्या दिवशीही विविध विधी

त्याचबरोबर आज(रविवारी) सकाळी दिल्लीत धुके असेल, जरी दिवसा आकाश निरभ्र असेल आणि काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. याशिवाय मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये २४ जानेवारीपर्यंत थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासांत पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल. सिक्कीम आणि मध्य प्रदेशातील विविध भागांमध्ये किमान तापमान 6-10 डिग्री सेल्सियस दरम्यान नोंदवले आहे.

Weather Update
Supreme Court: सुप्रीम कोर्टाला 22 जानेवारी सुट्टी नाही! ठाकरे गटाच्या याचिकेवर होणार सुनावणी

'या' भागांमध्ये पावसाची शक्यता

स्कायमेट वेदर रिपोर्टनुसार, आज(रविवारी) केरळ, तामिळनाडू, लक्षद्वीप आणि अरुणाचल प्रदेशात किरकोळ पावसाची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडाच्या काही भागात सकाळी आणि रात्रीच्या दरम्यान दाट धुक्याची स्थिती असू शकते. पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर राजस्थान आणि मध्य प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात शीतलहर येऊ शकते.

महाराष्ट्रात काय परिस्थिती?

कोकणासह गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसंच विदर्भामध्ये पुढचे 5 ते 7 दिवस हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. मात्र उत्तरेकडील गार वाऱ्यांमुळे राज्यात थंडी कायम राहणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणामध्ये किमान तापमानात आणखी घट होऊ शकते.

दक्षिण कर्नाटक ते पूर्व विदर्भ या भागात असणारी कमी दाबाची रेषा शनिवारीही कायम होती. तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रावरील हवेची चक्रीय स्थिती देखील कायम आहे. त्यामुळे राज्यात थोडी आर्द्रता असल्याचे दिसून येते. त्याच्या प्रभावामुळे संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरण होते. राज्यातील हवामान पुढील पाच ते सात दिवस कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर पुढील ४८ तासांत तुरळक ठिकाणी हलके धुके पडेल. उर्वरित राज्यातील तापमानात फारसा बदल होणार नाही, अशी माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.

Weather Update
Vadodara Boat Capsized: नियतीची क्रूर थट्टा! आई-वडिलांना १७ वर्षांनंतर झाली मुलगी; बोट दुर्घटनेत गमावला जीव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.