पुढील 2-3 दिवसांत संपूर्ण भारतात मान्सूनचा होणार वर्षाव; हवामान खात्याचा इशारा

Weather Update
Weather Updateesakal
Updated on
Summary

येत्या दोन ते तीन दिवसांत संपूर्ण भारतात पावसाची शक्यता आहे.

Weather Update : सध्या मान्सूननं (Monsoon Season) पंजाब आणि हरियाणा व्यापला असून राजस्थानचा बहुतांश भागही मान्सूनच्या ढगांनी व्यापलेला आहे. भारतीय हवामान खात्यानं (Indian Meteorological Department IMD) सांगितलंय की, येत्या दोन ते तीन दिवसांत संपूर्ण भारतात पावसाची शक्यता आहे. कमी दाबाची रेषा उत्तर-पश्चिम राजस्थान ते बंगालच्या उपसागरापर्यंत खालच्या पातळीवर कायम आहे, त्यामुळं जोरदार वारे वाहू लागले आहे.

दरम्यान, राजस्थान, पंजाब, हरियाणा, हिमाचल, उत्तराखंड, महाराष्ट्र (Maharashtra), पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. उत्तराखंडमध्ये 5 जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, पुढील 5 दिवसांत मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडणार आहे. शिवाय बिहार, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील गंगेच्या भागात पुढील 4-5 दिवसांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलीय.

हवामान खात्यानुसार, दक्षिण गुजरात किनारपट्टीपासून दक्षिण महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाच्या रेषेमुळं कोकण, गोवा, कर्नाटक आणि केरळमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. त्यानंतर पुढील 5 दिवसांत गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. सर्वाधिक पाऊस असलेल्या भागांची माहिती देताना IMD नं सांगितलं की, शुक्रवारी सकाळी 8.30 ते संध्याकाळी 5.30 दरम्यान अजमेरमध्ये 11 सेमी, अलिबागमध्ये 9 सेमी आणि भिलवाडामध्ये 8 सेमी पावसाची नोंद झालीय.

Weather Update
'ज्यांना स्वत:चं सरकार वाचवता आलं नाही, त्यांना महाराष्ट्रात पाठवलं'

स्कायमेट या हवामान संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत गुजरात, कोकण, गोवा, कर्नाटक, केरळचा काही भाग, ईशान्य राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या काही भागात मध्यम ते जोरदार पाऊस झालाय. हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेशचा काही भाग, रायलसीमा, ओडिशाचा उत्तर किनारा, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, आसाम आणि अंदमान-निकोबार बेटांवरही हलका ते मध्यम पाऊस पडलाय. ईशान्य भारताच्या उर्वरित भागात, विदर्भाचा काही भाग, मराठवाडा, आंध्र प्रदेश, लक्षद्वीप, सौराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडला आहे.

Weather Update
आता भाजपनं शरमेनं मान खाली घालावी; नुपूर शर्माप्रकरणी काँग्रेसचा हल्लाबोल

मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत, हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी

मुंबईत मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं असून पावसामुळं हवामान खात्याकडून (Weather Department IMD) ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. संपूर्ण शहरात रेल्वे आणि बस सेवांवर मोठा परिणाम झाल्याचं पहायला मिळतंय. कुर्ला, चेंबूर, सायन, दादर आणि अंधेरीसह मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पावसानं हजेरी लावलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.