देशातील हवामानत झपाट्याने बदल होताना दिसत आहे. उत्तर भारतात थंडीची लाट आहे. तर, काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन दिवस उत्तरेकडे थंडीची लाट असणार आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा या ठिकाणी दाट धुक्याची चादर पसरली आहे. गारठा, दाट धुके यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे. यामुळे घरातून बाहेर पडणं कठीण झालं आहे.
गेल्या चार दिवसांपासून राजधानी दिल्लीत कडाक्याची थंडी आहे. या हिवाळ्याच्या हंगामातील नीचांकी किमान तापमान रविवारी नोंदवण्यात आले. तापमानात आणखी घसरण झाल्याने राष्ट्रीय राजधानीत धुके आणि थंडीची लाट आणखी तीव्र झाली आहे. दरम्यान, कमी दृश्यमानता आणि प्रदूषण गंभीर श्रेणीत पोहोचले आहे.
हवामान विभागाने सोमवारी सकाळी प्रामुख्याने आकाश निरभ्र आणि दाट ते दाट धुके राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. अंदाजानुसार, 14 जानेवारी ते 20 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय राजधानीत दाट धुक्यासह थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत दाट ते दाट धुके पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. वाऱ्याचा वेग वाढल्याने तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिल्ली, गुरुग्राम आणि फरिदाबादसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तर गौतम बुद्ध नगर आणि गाझियाबादसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
IGI विमानतळावर शून्य दृश्यमानता
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहाटे ५ वाजता शून्य दृश्यमानतेची नोंद करण्यात आली. भारतीय रेल्वेने रविवारी सांगितले की, राष्ट्रीय राजधानी आणि इतर अनेक राज्यांमध्ये दाट धुक्यामुळे दिल्लीकडे जाणाऱ्या २२ गाड्या एक ते सहा तास उशिराने धावल्या.
विक्रमी किमान तापमानाची नोंद
रविवारी दिल्लीचे किमान तापमान ३.५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले, जे या हिवाळ्यातले सर्वात कमी तापमान आहे. कमाल तापमान 20.6 अंश सेल्सिअस होते, जे हंगामाच्या सरासरीपेक्षा एक अंश जास्त आहे. शनिवारी किमान तापमान 3.5 अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे सामान्यपेक्षा 4 अंशांनी कमी होते.
या भागात पावसाची शक्यता
वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे पुढील ४८ तासांत जम्मू आणि काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद जोरदार पाऊस होईल, असं IMD कडून सांगण्यात आलं आहे.
याशिवाय जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे दक्षिण भारतात तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ, माहे, किनारी आंध्र प्रदेश, यानम, रायलसीमा आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात ईशान्य मोसमी पाऊस थांबण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे.
महाराष्ट्रातील परिस्थिती कशी?
काही दिवसांपुर्वी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. याचा रब्बी हंगामातील पीकांना फटका बसला. दोन दिवसांपासून राज्यातील ढगाळ वातावरण निवळलं आहे. त्यामुळे पुन्हा थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. येत्या चार ते पाच दिवसांत मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत हलका पाऊस होईल, उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.