Weather Update: भारतातून मान्सून चार दिवस उशिराने माघारी; यंदा किती झाला पाऊस?

Weather Update
Weather Update
Updated on

नवी दिल्ली- भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) गुरुवारी सांगितलं की, दक्षिण-पश्चिमी मान्सून १५ ऑक्टोबरच्या तारखेऐवजी चार दिवसानंतर म्हणजे गुरुवारी देशातून पूर्णपणे परतला आहे. मान्सूनच्या परतीचा प्रवासही आठ दिवस उशिराने सुरु झाला होता. २५ सप्टेंबरला मान्सूनने परतीचा प्रवास सुरु केला होता. सर्वसाधारणपणे, दक्षिण-पश्चिम मान्सून एक जूनपर्यंत केरळमध्ये धडकतो आणि आठ जुलैपर्यंत संपूर्ण देशात पोहोचतो.

उत्तर पश्चिम भारतामधून १७ सप्टेंबरला मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु करतो. १५ ऑक्टोंबरपर्यंत मान्सून पूर्णपणे परततो. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम मान्सून १९ ऑक्टोंबरपर्यंत संपूर्ण देशातून परत गेला आहे. दक्षिण भारतात पूर्व-उत्तर हवा वाहण्यास सुरवात होऊन दोन ते तीन दिवसात या भागात उत्तर-पूर्व मान्सून पाऊस सुरु होऊ शकतो. (weather update monsoon return from india rainfall forecast imd)

Weather Update
Monsoon Update : मान्सून अतिसक्रिय! राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज; हवामान विभागाची माहिती

सामान्यपणे, उत्तर-पूर्व मान्सूनचे सुरुवातीचे चरण कमकूवत राहण्याची शक्यता आहे. भारतामध्ये अल निनोचा चांगलाच प्रभाव जाणवला. त्यामुळे चार महिन्यांचा (जून-सप्टेंबर) कालावधीत पाऊस कमी पडला. सरासरी या चार महिन्यांमध्ये ८६८.६ मिमी पाऊस पडतो, पण यंदा ८२० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

Weather Update
Weather Update : भारतातून नैऋत्य मान्सून माघारीला सुरुवात; सामान्यापेक्षा आठ दिवस झाला उशीर

२०२३ पूर्वी चार वर्षे भारतामध्ये मान्सून चांगला राहिला. काही वर्षे सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडला. एलपीएच्या ९६ टक्के ते १०४ टक्क्यापर्यंत पडलेला पाऊस सामान्य समजला जातो. दक्षिण अमेरिकीजवळील प्रशांत महासागराचे पाण्याचे तापमान वाढल्यास त्याला अल निनो प्रभाव म्हटलं जाते. याच प्रभावामुळे यंदा भारताचे मान्सून कमकुवत आणि वातावरण शुष्क राहिले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.