Mocha Cyclone Updates : मोचा चक्रीवादळाबाबत मोठी अपडेट! IMD ने जारी केला 'हा' इशारा

 फाइल फोटो
फाइल फोटोesakal
Updated on

मागील काही दिवसांपासून मोचा या चक्रीवादळाने अनेकांची चिंता वाढवली आहे. यंदाच्या वर्षातील पहिले चक्रीवादळ मे महिन्यात येण्याची शक्यता वर्तवली जात होती.  यादरम्यान हे चक्रीवादळ भारतीय किनारपट्टीपासून दूर जाण्याची शक्यता असून, बुधवारपर्यंत ते आग्नेय बंगालच्या उपसागरात विकसित होण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मंगळवारी सांगितले.

दरम्यान, मंगळवारी सकाळी 5.30 वाजता रेकॉर्ड केलेल्या लेटेस्ट उपग्रह डेटा अपडेटनुसार, दक्षिण अंदमान समुद्र आणि आग्नेय बंगालच्या उपसागरावर कमी-दाब पट्ट्याची तिव्रता वाढली आहे (वाऱ्याचा वेग 31 किमी/तास पेक्षा कमी) आणि संध्याकाळपर्यंत याची तिव्रता आणखी (वाऱ्याचा वेग 31-50 किमी/तास) वाढेल आणि त्याच प्रदेशात ते प्रबळ होईल.

हे वादळ बुधवारपर्यंत आग्नेय आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात चक्री वादळात विकसित होईल असेही IMD ने मंगळवारी सांगितले आहे. सोमवारी प्रसिद्ध झालेल्या IMD च्या संभाव्य चक्रीवादळाच्या अंदाजानुसार हे वादळ उत्तर-वायव्य दिशेला म्हणजेच भारताच्या पूर्व किनार्‍यापासून दूर जाण्याचा अंदाज आहे.

 फाइल फोटो
Jitendra Awhad : "अन् कुरूलकरने एका बाईसाठी देश विकायला…"; आव्हाडांनी केरळ स्टोरीवरुन साधला निशाणा

तसेच हे चक्रीवादळ सुरुवातीला 12 मेच्या सकाळपर्यंत उत्तर-वायव्य दिशेकडे सरकेल, त्यानंतर ते हळूहळू उत्तर-ईशान्य दिशेकडे आणि बांगलादेश-म्यानमार किनार्‍याकडे वळण्याची शक्यता आहे, असे आयएमडीचे महासंचालक म्युत्युंजय महापात्रा यांनी सोमवारी सांगितले.

हेही वाचा - Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान जवळ येत असलेल्या वादळाच्या पार्श्वभूमीवर, हवामान विभागाने मासेमारी, शिपिंग आणि पर्यटकांना खोल समुद्र जाणे तात्पुरते थांबवण्यास सांगण्यात आले आहे. तसेच पुढील दोन दिवसांत अंदमान आणि निकोबार बेटांवर 40-50 किमी/तास वेगाने वाऱ्यासह मध्यम पाऊस (24 तासांत 15.6-64.5 मिमी) पडण्याची शक्यता आहे.

 फाइल फोटो
Devendra Fadnavis : सत्तासंघर्षाच्या निकालावर फडणवीस बोलले! राजकीय पंडितांना दिला मोलाचा सल्ला

हे वर्षातील पहिलं वादळ

हे वर्षातील पहिले चक्रीवादळ असणार आहे. महत्वाचे म्हणजे भारतात दुहेरी चक्रीवादळ हंगाम आहेत पहिला म्हणजे मान्सूनपूर्व (एप्रिल-जून) आणि मान्सूननंतरचा (ऑक्टोबर-डिसेंबर). यापैकी मे आणि नोव्हेंबर हे सर्वाधिक चक्रीवादळ प्रवण महिने आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये देखील चक्रीवादळ असनी आंध्र प्रदेश किनारपट्टीला धडकले होते. त्यावेळी लक्षणीय पाऊस आणि सोसाट्याचा वारा आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.