दिल्लीत उष्मा वाढणार, आसाममध्ये पूर; 'या' राज्यांना अतिवृष्टीचा इशारा

Weather Update Today
Weather Update Todayesakal
Updated on
Summary

देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सून दाखल झालाय, तर अनेक राज्ये मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत.

Weather Update Today : देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सून (Monsoon) दाखल झालाय, तर अनेक राज्ये मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. या सगळ्यात गुजरात (Gujarat), मध्य प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक आणि झारखंडमध्ये पावसाची शक्यता आहे. आज भोपाळमध्ये मेघगर्जनेसह पाऊस कोसळू शकतो. तर, अहमदाबादमध्येही ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील कोकणसह काही भागात अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आलाय.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील मुंबई, कोकणसह काही भागात पाऊस सुरु आहे, तर काही भागात अद्यापही मान्सूनं हजेरी लावली नाहीय. त्यामुळं शेतकऱ्यांत चिंतेचं वातावरण आहे. तर बिहारच्या अनेक भागात मान्सून दाखल झालाय. त्यामुळं अनेक भागात पावसाच्या (Rain Update Today) हालचाली पाहायला मिळत आहेत. पावसामुळं बिहारमधील अनेक भागात तापमानात घट झालीय. राजधानी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानंतर हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार (Weather Department), आज दिल्लीत आकाश निरभ्र असणार आहे. मात्र, तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

Weather Update Today
'या' दोघांची मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदी निवड; बंडखोर आमदाराची Audio Clip व्हायरल

'या' राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा

हवामान खात्यानुसार, नैऋत्य मोसमी पावसानं देशाच्या पूर्व भागात हजेरी लावल्यानंतर आता पश्चिम भागात पावसाची शक्यता आहे. अंदाजानुसार, कर्नाटक (Karnataka), कोकण, गोवा, केरळ, महाराष्ट्र (Maharashtra), आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.

Weather Update Today
महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर आसामच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान; म्हणाले..

आसाम पूरस्थिती गंभीर

आसाममध्ये पूरस्थिती गंभीर आहे. पुरात अडकलेल्या लोकांची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. NDRF नं आतापर्यंत सुमारे 17,500 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलंय. दरम्यान, पूरग्रस्त 14 जिल्ह्यांमध्ये NDRF च्या 26 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. राज्यात १६ जूनपासून बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आलंय. यादरम्यान नऊ जणांचे प्राण वाचले आहेत. एनडीआरएफनं सांगितलं की, 'राज्यातील 54.5 लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसलाय. आणखी 12 जणांचा मृत्यू झाला असून मे'च्या मध्यापासून पुरामुळं मृतांची संख्या 101 वर पोहोचलीय.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.