Weather Update Today: हिमाचलमध्ये बर्फवृष्टी, दिल्लीत कडाक्याची थंडी! तर 'या' राज्यांमध्ये पावसाचा इशारा

 weather update rain forecast imd marathi news
weather update rain forecast imd marathi newssakal
Updated on

Weather Update Today: राज्यासह देशभरात मागील काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. राजधानी दिल्लीत कडाक्याची थंडी सुरू झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत दक्षिणेकडील तमिळनाडू आणि केरळमध्ये पावसाची शक्यता आहे. याशिवाय लडाख, हिमाचल प्रदेश आणि मुझफ्फराबादमध्येही हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे. तसेच, आज म्हणजेच रविवारी (१७ डिसेंबर) हिमाचल प्रदेशातील अनेक भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.

हवामान खात्यानुसार, रविवारी (१६ डिसेंबर) दिल्लीत कमाल तापमान २५ अंश, तर किमान तापमान ७ अंश राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने देलेल्या माहितीनुसार, २१ डिसेंबरपर्यंत किमान तापमान ५ अंश आणि कमाल तापमान २३ अंश असू शकते. यासोबतच येत्या काही दिवसांत दिल्ली-एनसीआरमध्ये सकाळी हलके धुके पडण्याची शक्यता आहे.

 weather update rain forecast imd marathi news
Pune Crime News : धक्कादायक! पुण्यात पाळीव कुत्र्याला जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार

हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, पंजाब, हरियाणा-चंडीगढ-दिल्ली, उत्तर प्रदेशच्या काही भागात गेल्या २४ तासांत किमान तापमान ४-८ °C आणि उत्तर राजस्थानच्या अनेक भागात ८-११ C नोंदवले गेले. याशिवाय दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. १७ डिसेंबर रोजी राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. दरम्यान पावसाळ्यात हवामानाशी संबंधित खबरदारी घ्या असा आवाहन हवामान विभागाने केला आहे.

 weather update rain forecast imd marathi news
Rohit Sharma : दुल्हन की बिदाई का वक्त...; MI फॅन्सवर कोसळलं आभाळ! रोहितच्या हकालपट्टीनंतर मीम्सचं वाढलं पीक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.