Weather Update: तामिळनाडूसह 'या' राज्यात आज पुन्हा पावसाची शक्यता; महाराष्ट्रासह उत्तर भारतात कडाक्याची थंडी

दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह महाराष्ट्रात गारठा वाढला आहे.
Weather Update
Weather UpdateEsakal
Updated on

अनेक राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. तर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजपासून देशभरात थंडीचा कडाका वाढणार आहे. दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. त्याचबरोबर आज पुन्हा काही भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या महितीनुसार, आज आणि उद्या (26 डिसेंबर ते 27 डिसेंबर)दरम्यान पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये सकाळच्या सुमारास दाट धुक्याची चादर दिसून येईल, तर राजस्थानमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पर्वतीय भागात जोरदार बर्फवृष्टी सुरु आहे. परिणामी उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या हवामानावर मोठा परिणाम होताना दिसत आहे.

Weather Update
Earthquake News : भल्या पहाटे लेह-लडाखमध्ये भूकंपाचे धक्के; रिश्टर स्केलवर 4.5 तीव्रतेची नोंद

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज (मंगळवारी) किमान तापमान 7 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता कमी असली तरी दाट धुक्यामुळे दिल्लीतील लोकांच्या अडचणी वाढू शकतात.

Weather Update
Power Generation : ऊर्जेसाठी सरकारला हवी कोळशाची ‘ब्लॅक पॉवर’; उभारले जाणार नवे प्रकल्प

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज देखील तामिळनाडूमध्ये पावसाची शक्यता आहे. तामिळनाडूमध्ये किनारपट्टी भागात मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यासह देशाच्या तापमानात कमालीची घट झाली आहे.

तर पुढील दोन दिवसांमध्ये (27 आणि 28 डिसेंबर) तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यातील परिस्थिती कशी?

राज्यात थंडीचा कडाका कमी-अधिक होत आहे. राज्यात गारठा कायम असून उत्तर महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी तापमानाचा पारा दहा अंशांखाली आहे. राज्याच्या किमान तापमानात वाढ होणार असल्याने गारठा काहीसा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.