Weather Update: हिवाळ्यात पावसाळा! उत्तर प्रदेश-बिहारमध्ये कडाक्याच्या थंडीत पावसाची शक्यता; धुक्यांमुळे अनेक विमान उड्डाणे रद्द

Weather Update: उत्तर भारतात कडाक्याच्या थंडी पडली आहे. यात भागांमध्ये थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेशमध्ये डोंगराळ राज्यांपासून मैदानी भागात थंडी वाढणार आहे.
 weather update
weather update eSakal
Updated on

उत्तर भारतात कडाक्याच्या थंडी पडली आहे. यात भागांमध्ये थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेशमध्ये डोंगराळ राज्यांपासून मैदानी भागात थंडी वाढणार आहे. येथे येत्या काही दिवसांत तीव्र थंडीची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, दिल्ली एनसीआरमध्येही थंडीची लाट तीव्र होणार आहे. कारण, येत्या काही दिवसांत येथे मुसळधार पाऊस सुरू होणार आहे. पावसामुळे येथील थंडी आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.

राजस्थान, हरियाणा आणि पंजाबमध्ये थंडीची तीव्र लाट कायम राहणार

स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासांदरम्यान उत्तर राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या काही भागांमध्ये तीव्र थंडीची स्थिती कायम राहू शकते.

उत्तर प्रदेशात थंडीची स्थिती निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर पूर्व राजस्थानमध्ये थंडीची लाट येण्याचीही शक्यता आहे. (Severe cold wave in Rajasthan, Haryana and Punjab

 weather update
India-China Relation: "भारताचे चीनसोबतचे संबंध ठीक नाहीत"; परराष्ट्र मंत्रालयाचा मोठा खुलासा

दिल्ली आणि आसपासच्या भागात ९ जानेवारीला पाऊस

दिल्ली एनसीआरमध्ये काल गुरुवारी थंडीचा कडाका होता. सफदरजंग परिसरात कमाल तापमान १२.५ अंश सेल्सिअस आणि किमान तापमानही ७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. स्कायमेटच्या माहितीनुसार, दिल्ली एनसीआरच्या लोकांनी गोठवणाऱ्या थंडीसाठी सज्ज व्हावे. दिल्ली आणि आसपासच्या भागात ९ जानेवारीला पाऊस पडेल. 11 जानेवारीनंतरच दिलासा अपेक्षित आहे.

 weather update
Ram Mandir New Photos: राम मंदिराचे नवे फोटो आले समोर! प्रवेशद्वारावर असणार 'या' विशेष मूर्ती

या भागांमध्ये पावसाची शक्यता

लक्षद्वीप, केरळ आणि किनारी कर्नाटकात काही ठिकाणी मुसळधार पावसासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. त्याच वेळी, तामिळनाडू, अंतर्गत कर्नाटक, रायलसीमा, अंदमान आणि निकोबार बेटांचा दक्षिण भाग, आंध्र प्रदेशचा दक्षिण किनारा, मध्य प्रदेशचा काही भाग, उत्तर छत्तीसगड, पूर्व उत्तर प्रदेश, झारखंडच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. बिहार, गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात 1 किंवा 2 ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. (Chance of rain in these parts)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()