मंगळवारी पहाटे दिल्लीमध्ये जोरदार पाऊस झाला. ढगांच्या गडगडाटासह झालेल्या पावसामुळे वातावरण थंड झाले. दिल्लीमधील हवामान गेल्या काही दिवसांपासून सतत बदलत आहे. (Weather Updates delhi ncr Heavy Rain alert)
एप्रिल महिन्याची सुरुवात ढगाळ वातावरणाने होण्याची शक्यता हवामान खात्याने यापूर्वी व्यक्त केली होती. तसेच 4 एप्रिलपर्यंत कमाल तापमान 28 ते 31 अंशांच्या दरम्यान राहील आणि किमान तापमान 15 ते 16 अंशांच्या दरम्यान राहील. साधारणत: 1 एप्रिल ते 5 एप्रिलपर्यंत कमाल तापमान 33.5 आणि किमान तापमान 18.5 अंश सेल्सिअस असते.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, आज 4 एप्रिल रोजी संपूर्ण दिल्ली, एनसीआर आणि गन्नौर, रोहतक, भिवानी (हरियाणा) बरौत, शिकारपूर, खुर्जा (उत्तर प्रदेश) आणि लगतच्या भागात हलका ते मध्यम पाऊस आणि वादळाची शक्यता आहे.
याशिवाय किठोर, गढमुक्तेश्वर, हापूर, सियाना, शिकोहाबाद, बुलंदशहर, अनूपशहर, नरोरा, जत्री, अलीगढ, कासगंज, रोहतक, खुर्जामध्ये पुढील काही तासांत वादळी वाऱ्याची शक्यता आहे.
सततच्या पावसामुळे चैत्र महिन्यात आषाढ महिन्याप्रमाणे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र, या अवकाळी पाऊसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.