नवी दिल्ली : आफ्रिकी चित्त्यांच्या भारतातील पुनर्वसनाचा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता वेबसिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चार भागांतील वेबसिरीजला केंद्र सरकारकडून मान्यता देण्यात आली असून या प्रकल्पात सहभागी असलेल्या सर्वच घटकांच्या प्रयत्नांवर या माध्यमातून प्रकाशझोत टाकण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली.