‘Make In India..’ प्रमाणे करा ‘Wed In India’, उत्तराखंडमध्ये मोदींचे श्रीमंतांना खास आवाहन

प्रत्येक श्रीमंताने वर्षातून एकदा कुटुंबातील सदस्याचा विवाह उत्तराखंडमध्ये करावा
Wed In India
Wed In Indiaesakal
Updated on

Wed In India :

'मेक इन इंडिया'च्या धर्तीवर देशाला 'वेड इन इंडिया' सारख्या चळवळीची गरज असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितले. पंतप्रधानांनी प्रभावशाली उद्योगपतींना दरवर्षी उत्तराखंडमध्ये त्यांच्या कुटुंबातील सदस्याचे 'डेस्टिनेशन वेडिंग' आयोजित करण्याचे आवाहन केले.

सध्या वेडिंग डेस्टिनेशन करण्याचे फॅड आहे. पण श्रीमंत लोकांमध्ये वेडिंग डेस्टिनेशनसाठी परदेशातील लोकेशन्सची निवड केली जाते. त्यावरूनच श्रीमंत लोकांनी भारतातील निसर्गरम्य ठिकाणांची निवड करावी, यामुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल, असेही ते म्हणाले.

Wed In India
Uttarakhand Tunnel: बचावकार्यात सहभागी कर्मचाऱ्यांचा सन्मान! उत्तराखंड सरकारकडून बक्षीस जाहीर

उत्तराखंडमध्ये 'एफआरआय' ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटच्या उद्घाटन कार्यक्रमात उपस्थित होते. त्यावेळी बोलताना, पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'डेस्टिनेशन वेडिंग'साठी परदेशात जाणे हा लक्षाधीश आणि अब्जाधीश व्यावसायिकांमध्ये ट्रेंड बनला आहे.

शेवटच्या मन की बात कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान मोदींनी श्रीमंत व्यावसायिक कुटुंबांना परदेशात जाण्याऐवजी देशात लग्न समारंभ आयोजित करण्याचे आवाहन केले होते.

Wed In India
Uttrakhand Election: सहा महिन्यांत ५५० पेक्षा जास्त निर्णय घेऊन कार्यवाही केली-धामी

ते म्हणाले, “लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असी जुनी म्हण आहे. मग तरुण लोक लग्नासाठी परदेशात जाण्याऐवजी देवभूमी उत्तराखंडमध्ये का येत नाहीत. मी तरुणांना आणि श्रीमंत लोकांना सांगतो की, 'मेक इन इंडिया'च्या धर्तीवर 'वेड इन इंडिया' सारखी चळवळ होण्याची गरज आहे.

'डेस्टिनेशन वेडिंग'साठी प्रत्येक श्रीमंताने वर्षातून एकदा कुटुंबातील सदस्याचा विवाह सोहळा उत्तराखंडमध्ये आयोजित केला. वर्षभरात येथे पाच हजार विवाह होऊ लागले, तर योग्य पायाभूत सुविधांचा विकास होईल. लवकरच उत्तराखंड आंतरराष्ट्रीय वेडिंग डेस्टिनेशन म्हणून उदयास येईल, असेही मोदी म्हणाले.

Wed In India
Uttarakhand: उत्तराखंडसाठी दुबईत रोडशो; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 12 हजार कोटींच्या बंपर गुंतवणूक करारांवर स्वाक्षरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()