कोलकता : गावातील प्रतिष्ठित लोक प्रवास करणार असतील तर पूर्वी बस आणि क्वचित रेल्वेगाड्या त्यांच्यासाठी काही वेळ थांबून राहायच्या, असे वर्णन ऐकायला किंवा वाचायला मिळते. आता तो काळ गेला असला तरी तसाच एक प्रसंग पश्चिम बंगालमध्ये घडला आहे. वऱ्हाडाला विवाहस्थळी वेळेत पोहोचता यावे म्हणून रेल्वे प्रशासनाने रेल्वेगाडी काही वेळ थांबवून ठेवल्याची घटना हावडा स्थानकावर घडली.