हनिमूनसाठी खोलीत गेले अन् सगळचं संपल...

wedding night turns tragic as tamil nadu groom kills bride hangs self
wedding night turns tragic as tamil nadu groom kills bride hangs self
Updated on

चेन्नईः मोठ्या उत्साहात विवाह दुपारी पार पडला. विवाहानंतर संध्याकाळी हनिमूनसाठी खोलीत झोपायला गेले आणि मोठा आवाज झाला. नवरदेवाने नवरीचा खून केला आणि पळत जाऊन त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. विवाहाच्या दिवशीच नवदांपत्याचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निथीवसन आणि संध्या यांचा बुधवारी (ता. 10) विवाह मोठ्या उत्साहात पार पडला. विवाहाला जवळचे नातेवाईक उपस्थित होते. विवाहानंतर नवदांपत्य घरी आले होते. घरी उत्साहाचे वातावरण होते. संध्याकाळी सर्वांनी एकत्रित जेवण केले. नवरा आणि नवरी हनिमूनसाठी खोलीमध्ये गेले. मात्र, काही वेळानंतर संध्याचा मोठ्याने आवाज आला. यामुळे घरातील नागरिकांनी खोलीकडे धाव घेतली. यावेळी संध्या रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. निथीवसने तिच्या डोक्यात जड वस्तूने घाव घातले होते. निथीवसनने घरातून पळ काढला. काही वेळानंतर त्याने जवळच्या एका झाडाला गळफास घेऊन आत्मत्या केली. याबाबत हत्या आणि आत्महत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, हनिमूनच्या रात्रीच हत्या आणि आत्महत्येची घटना तिरुवल्लूर जिल्ह्यात घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. सर्व आनंदी वातावरण असताना निथीवसन याने असे कृत्य का केले याबाबत परिसरातील नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.