पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आजपासून सुरुवात झाली. दरम्यान, मतदानाच्या पहिल्याच दिवशी तृणमूलमधून भाजपत दाखल झालेल्या सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांचे भाऊ सुमेंदू अधिकारी (Soumendu Adhikari) यांच्या कारवर कोंटई येथे हल्ला झाला आहे. या हल्ल्यात कारचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. मात्र, या हल्ल्यावेळी सुमेंदू अधिकारी हे कारमध्ये नव्हते. दरम्यान, या हल्ल्यामागे तृणमूलचा हात असल्याचा आरोप सुवेंदू अधिकारी यांनी केला आहे.
सुमेंदू अधिकारी यांच्या कारवरील हल्ल्यात चालक जखमी झाला आहे. सुवेंदू अधिकारी यांचे दुसरे भाऊ दिब्येंदू अधिकारी यांनी या हल्ल्यासाठी तृणमूल काँग्रेसचा एक नेता जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटलं की, "मला माहिती मिळाली आहे की तृणमूलच्या ब्लॉक अध्यक्षाने सुमेंदू अधिकारी यांच्या कारवर हल्ला घडवून आणला आहे. तसेच कारचालकालाही मारहाण केली असून यामध्ये चालक जखमी झाला आहे. या कारवर हल्ल्याची सूचना पोलिसांनी देण्यात आली आहे."
तृणमूल काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष राम गोविंद दास आणि त्यांच्या पत्नीने तीन मतदान केंद्रांवर गोंधळ माजवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान माझं या ठिकाणी येणं हे त्यांच्या या बेकायदा कृत्यासाठी अडचणीचं ठरल्यानं त्यांनी माझ्या कारवर हल्ला केला आणि माझ्या चालकाला मारहाण केली, असा आरोप सुमेंदू अधिकारी यांनी केला आहे.
आजपासून पश्चिम बंगाल (West bengal assembly election 2021) आणि आसाम विधानसभा (Assam assembly election 2021) निडवणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली. दोन्ही राज्यात जवळपास दीड कोटींहून अधिक मतदार आहेत. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात ३० मतदारसंघात मतदान होत आहे. यामध्ये पुरुलिया आणि झाडग्राम जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील मतदान होणार आहे. तर आसाममध्ये पहिल्या टप्प्यात ४७ जागांसाठी मतदान होत आहे. राज्यात तीन टप्प्यात मतदान होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.