‘पॅराशूट’ उमेदवारीमुळे नाराजी; भाजपने आयारामांना तिकीट दिल्याने आंदोलन

Rabindranath-Bhattacharya
Rabindranath-Bhattacharya
Updated on

कोलकता - पश्‍चिम बंगालच्या रणधुमाळीने संपूर्ण देशाचे लक्ष वेधलेले असून दररोजच्या नाट्‌यमय वळणाने लढतीत रंग भरत चालला आहे. विधानसभेसाठी भाजपने काल उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर काही ठिकाणच्या उमेदवारीला आक्षेप घेण्यात आला. परिणामी भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विरोधात आंदोलन केले. ‘पॅराशूट उमेदवारीमुळे पक्षाचे नुकसान होऊ शकते, अशा शब्दात नाराजी व्यक्त केली गेली. तृणमूल सोडून आलेले रवींद्रनाथ भट्टाचार्य, अर्थतज्ञ अशोक लाहिरी आणि बिशल लामा यांच्या उमेदवारीने भाजप कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तृणमूलमधून भाजपमध्ये आलेले ८९ वर्षीय रवींद्रनाथ भट्टाचार्य यांना तिकीट दिल्याने भाजप कार्यकर्त्यांत नाराजी आहे. उमेदवारांत बदल न केल्यास अपक्ष उमेदवार उभा करण्याचा इशारा देण्यात आला. सिंगूर भाजपचे उपाध्यक्ष संजय पांडे यांनी पक्षश्रेष्ठींवर आरोप करताना भट्टाचार्य यांना उमेदवारी जाहीर करताना स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप केला. त्याचबरोबर बेहाला ईस्ट येथील उत्तरपारा आणि रैडघी येथेही भाजपच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी यादीविरोधात आंदोलन केले. बिशल लामा यांना तिकीट दिल्याने भाजपचे जिल्हाध्यक्ष गंगाप्रसाद शर्मा यांनी आश्‍चर्य व्यकत केले आहे. बिशल लामा हे गोरखा जनमुक्ती मोर्चाचे विमल गुरुंग यांच्या गोटातील आहेत आणि त्यांना उत्तर बंगालमधील कालचिनी येथून उमेदवारी दिली आहे. लामा यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. (विमल गुरुंग यांनी टीएमसीला पाठिंबा दिला  आहे.) शर्मा यांच्या निवासस्थानासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केले असून लामा यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी केली आहे. 

भाजपकडून अर्थतज्ञ अशोक लाहिरी यांना अलिपूरद्वार मतदारसंघातून तिकीट दिले आहे. लाहिरी यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष गंगा प्रसाद शर्मा यांनी लाहिरीबाबत फारशी माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शर्मा यांच्या वक्तव्याने अलीपूरद्वार येथील भाजप कार्यकर्त्याच्या मनातील खदखद उघड झाली आहे. अशोक लाहिरी हे भारत सरकारचे आर्थिक सल्लागार राहिले असून ते दिल्लीत राहतात. लामा यांची उमेदवारी आपल्याला टीव्हीवरूनच समजल्याचे शर्मा म्हणाले. केंद्रीय नेतृत्वाने एखाद्या पॅराशूटप्रमाणे काहींना उमेदवारी दिली असून त्यात स्थानिकांच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची मने जाणून घेतली नाही, असे कार्यकर्ते बोलत आहेत. 

सोवन, बैसाखी चॅटर्जी यांची भाजपला सोडचिठ्ठी
कोलकताचे माजी महापौर, माजी मंत्री आणि तृणमूलमधून भाजपमध्ये आलेले  सोवन चॅटर्जी आणि त्यांच्या सहकारी बैसाखी बॅनर्जी यांनी अपेक्षेप्रमाणे उमेदवारी न मिळाल्याबद्धल भाजपला सोडचिठ्‌ठी दिली असून त्याबाबत त्यांनी बंगालच्या भाजप प्रदेशाध्यक्षांना वेगवेगळे पत्र लिहले आहे. बेहाला वेस्टमधून सोवन यांना उमेदवारी दिली गेली होती. याउलट बेहाला ईस्ट हा सोवन यांचा मतदारसंघ असून तेथून अभिनेत्री पायल सरकार यांना उमेदवारी दिली आहे. पायल सरकारने तीन आठवड्यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बैसाखी यांच्या उमेदवारीवरुनही  सोवन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बैसाखी यांच्याकडे अन्य उमेदवारांच्या तुलनेत उमेदवारी मिळवण्याची पात्रता असतानाही डावलल्याबद्दल सोवन यांनी आक्षेप घेतला.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.