कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत जेष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला असून आणखी पाच आमदारांनी भाजपमध्ये एन्ट्री केली. यामध्ये आमदार सोनाली गुहा, दीपेंदु बिस्वास, रविंद्रनाथ भट्टाचार्य, जटू लहिरी आणि हबीबपूरच्या टीएमसी उमेदवार सरला मुर्मू यांचा समावेश आहे. यावेळी पश्चिम बंगाल भाजप अध्यक्ष दिलीप घोष, भाजप नेते शुभेंदु अधिकारी आणि मुकुल रॉय उपस्थित होते.
गेल्या तीन महिन्यांमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये गेले आहेत. सातत्यानं पक्षातील नेत्यांनी बाहेरची वाट धरल्यानं निवडणुकीत काय होणार याची चर्चा सुरु आहे. डायमंड हार्बर आमदार दीपक हलदर, माजी मंत्री शुभेंदु अधिकारी, राजीव बॅनर्जी, अभिनेते यश दासगुप्ता, हीरन चॅटर्जी यांच्यासह 6 हून अधिक अभिनेते भाजपमध्ये गेले आहेत. याशिवाय इतरही काही नेते पक्ष सोडण्याची धमकी देत आहेत.
तृणमूल काँग्रेस यावेळी 294 पेकी 291 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर तीन जागा सहकारी पक्ष गोरखा जनमुक्ती मोर्चाला देण्यात आली आहे. यावेळी जवळपास 50 महिलांना निवडणुकीत उतरवण्यात येत आहे. दरम्यान, भाजपने ममता बॅनर्जी यांच्या सरकारच्या काळात महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे.
महिलांना आकर्षित करण्यासाठी तृमणूल काँग्रेसनं त्यांच्या निवडणूक मोहिमेत आरोग्य साथी आणि कन्याश्री या योजनांचा प्रचार केला आहे. त्यांनी निवडणुकीत घोषणासुद्धा बंगाल को अपनी बेटी चाहिए अशी केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि प्रवक्त्या काकोली घोष दस्तीदार यांच्या मते यावेळी मतदार पाहतील की 'एकटी महिला बंगालच्या सन्मानासाठी बाहेरच्या लोकांशी लढत आहे.'
काकोली घोष दस्तीदार यांनी म्हटलं की, 1998 मध्ये जेव्हा तृणमूल काँग्रेसची स्थापना झाली होती तेव्हापासून ममता बॅनर्जी यांनी नेहमीच प्रयत्न केला की, पंचायत, नगर पालिका, राज्य किंवा लोकसभा निवडणुकांमध्ये जास्ती जास्त महिला उमेदवारांना संधी दिली जाईल. यावेळी निवडणुकीत 50 महिला उमेदवार उभा केले असून 2016 च्या तुलनेत ही संख्या पाचपट आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.