कोलकाता (west bengal assembly election 2021)- पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून ममता बॅनर्जी (mamta banarjee) यांच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेसला (TMC) उत्तुंग असे यश मिळालं आहे.
कोलकाता (west bengal assembly election 2021)- पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून ममता बॅनर्जी (mamta banarjee) यांच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेसला (TMC) उत्तुंग असे यश मिळालं आहे. भाजपनेही (BJP) यावेळी चांगली कामगिरी केली असून 77 जागांवर यश मिळवलंय. भाजपला 2016 च्या विधानसभा निवडणुकीत केवळ 3 जागा मिळवता आल्या होत्या. दुसरीकडे काँग्रेस आणि डाव्यांच्या आघाडीच्या पदरी मोठी निराशा पडली आहे. काँग्रेस (congress) किंवा डावे यांना एकही जागा जिंकता आलेली नाही. विशेष म्हणजे तिसऱ्या आघाडीने उभ्या केलेल्या उमेदवारांपैकी 85 टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालीये. ( west bengal assembly election 2021 result congress rahul gandhi deposit)
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांनी पश्चिम बंगालमध्ये प्रचारसभा न घेण्याचा निर्णय घेतला होता. पण, हे जाहीर करण्याआधी त्यांनी दोन मतदारसंघामध्ये प्रचारसभा घेतल्या होत्या, या दोन्ही ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. राहुल गांधी यांनी माटीगारा-नक्सलबाडी आणि गोलपोखर या दोन मतदारसंघांमध्ये प्रचारसभा घेतल्या होत्या. माटीगारा-नक्सलबाडीचे काँग्रेसचे उमेदवार शंकर मालाकार यांना 9 टक्के मते मिळाली आहेत, तर गोलपोखरच्या उमेदवाराला 12 टक्के मतं मिळाली आहे. विशेष म्हणजे माटीगारा-नक्सलबाडी आणि गोलपोखर मतदारसंघ यापूर्वी काँग्रेसकडेच होते. 'न्यूज 18'ने यासंदर्भातील माहिती दिली आहे.
तिसऱ्या आघाडीने 292 जागांवर उमेदवार उभे केले होते, पण एकही उमेदवार निवडून न आल्याची नामुष्की त्यांच्यावर ओढावली आहे. काँग्रेस, डावे आणि भारतीय धर्मनिरपेक्ष मोर्चाने एकत्र निवडणूक लढवली होती. डाव्यांनी 170 जागांवर निवडणूक लढवली होती, त्यातील 21 जागांवर त्यांना डिपॉझिट वाचवता आलं. काँग्रेसने 90 जागांवर निवडणूक लढवली होती, त्यातील 11 जागांवर त्यांना डिपॉझिट वाचवता आलं. भारतीय धर्मनिरपेक्ष मोर्चाच्या उमेदवारांचे 30 पैकी 10 जागांवर डिपॉझिट वाचलं आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना मोठा विजय मिळाला आहे. भाजपने यावेळी बंगालमध्ये मोठा जोर लावला होता. त्याचे फळ भाजपला मिळाले आहे. भाजप 100 जागांच्या पुढे जाईल, असा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आला होता. पण, ममता बॅनर्जींनी हा अंदाज चुकीचा ठरवत आपली जादू कामय असल्याचं सिद्ध केलंय. असं असलं तरी त्यांना स्वत:च्या मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागलाय.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.