कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे वातावरण तापलं आहे. दरम्यान, आता बंगाल की बेटीवरून पोस्टर वॉर सुरु झालं होतं त्या 85 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी ट्विट करून याची माहिती दिली आणि तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. अमित शहांनी ट्विटरवर म्हटलं की, बंगाल की बेटी शोभा मुजुमदार यांच्या निधनाने दु:ख झालं आहे. तृणमूलच्या गुंडांनी त्यांना इतकी मारहाण केली की त्यात शोवा यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबाचं दु:ख आणि जखमा ममता दीदींची पाठ कधीच सोडणार नाहीत. बंगाल हिंसाचारमुक्त भविष्यासाठी लढेल. बंगाल आमच्या माता भगिनींच्या सुरक्षेसाठी लढेल असंही शहा यांनी म्हटलं आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटलं की, शोभा मुजुमदार यांच्या आत्म्याला इश्वर शांती देवो. मुलगा गोपाल भाजपचा कार्यकर्ता असल्यानं त्यांना जीव गमवावा लागला. त्यांचे बलिदान नेहमी लक्षात राहील. त्या बंगालची आई होत्या. मुलगी होत्या. भाजप नेहमीच आई आणि मुलीच्या सुरक्षेसाठी लढत राहील असंही नड्डांनी सांगितलं.
उत्तर 24 परगना जिल्ह्यातील निमटा इथं भाजप कार्यकर्ते गोपाल मुजुमदार आणि त्यांची 85 वर्षीय आई शोभा मुजुमदार यांच्यावर हल्ला झाला. शोभा यांचे म्हणणे होते की, माझ्या मुलाला माराहाण झाली कारण तो भाजपसाठी काम करतो. मला दोघांनी धक्का मारला, मुलाच्या डोक्यात आणि हाताला जखम झाली. मलाही दुखापत झाली आहे.
शोभा मुजुमदार यांनी सांगितलं होतं की, मला नीट बोलताही येत नाही आणि बसताही येत नाही. मारहाण करणारे तिघे चौघे होते. त्यांनी चेहरा झाकला होता. माझ्या मुलाला गप्प राहण्यास सांगितलं होतं. आम्हाला मारलं कारण माझा मुलगा भाजपसोबत काम करतो.
शोभा यांच्या दुसऱ्या एका मुलाने गोविंदने मात्र यामागे भाजपचा हात असल्याचं म्हटलं आहे. याबाबत एक व्हिडीओ तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँ यांनी शेअर केला होता. गोविंद यांच्या वक्तव्यानंतर ज्याला मारहाण झाली त्याने सांगितलं की, गोविंदशी आमचे काही देणे घेणे नाही. तो तृणमूलचा कार्यकर्ता आहे. तृणमूलने स्वत:ला वाचवण्यासाठी त्याच्याकडून वदवून घेतलं असल्याचा आरोपही केला आहे. आता या प्रकरणावरून भाजपने तृणमूलला घेरलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.