Khela Hobe : घरा घरांत मना मनांत टीएमसीला पाेचविणा-या नेत्यावरच झाली गेम

Debangshu Bhattacharya Dev
Debangshu Bhattacharya Dev
Updated on

सातारा : पश्चिम बंगाल निवडणुकीत (West Bengal Election) तृणमूल कॉंग्रेस (TMC) साठी 'खेल होबे' (Khela Hobe) हे स्लाेगन खूप उपयुक्त ठरल्याचे चित्र आहे. बंगालच्या युवकांच्या आेठातून खेला हाेबे हाेबे एवढंच येत आहे तरं जनतेचा उत्साह पाहून विराेधकांनी देखील खेला हाेबे ला आपलसं केल्याने पश्चिम बंगलामधील छाेट्या माेठ्या कार्यक्रमांत देखील खेला हाेबे खेला हाेबे याची धून वाजत आहे. दरम्यान खेला हाेबे हे गाणे लिहिणा-या टीएमसीचे युवा नेते आणि पक्षाचे प्रवक्ते देबांशु भट्टाचार्य देव ( Debangshu Dev)  यांना पक्षाने मात्र उमेदवारी नाकारली आहे.

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाकडे हिंसाचार आणि भिती पसरवण्याचा प्रयत्न असल्याचा प्रचारात मुद्दा पुढे केला असला तरी दुसरीकडे बंगालमधील प्रत्येक निवडणूक भाषणात खेला हाेबेचा उल्लेख हाेते आहे. साेशल मिडियावर तर हे गाणे कमालीचे व्हायरल हाेत आहे. छाेट्या माेठ्या पार्टींसह लग्नाच्या वरातीत डीजे लावून या गाण्यावर युवावर्ग नाचताना दिसते.

ममता बॅनर्जींनी भवानीपूर मतदासंघ सोडला, नंदीग्राममधून लढवणार निवडणूक

टीएमसी साठी 'खेला होबे' हे गाणे 25 वर्षीय अभियंता आणि टीएमसीचे युवा नेते देबांशु यांनी लिहिले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी स्वतः एकदा खेलाे हाेबे चा नारा दिल्यानंतर त्याची लाेकप्रियता वाढली. त्यानंतर भाजपचे नेते राजनाथसिंह यांनी निश्चित हाेबे खेला हाेबे असे ममतांना प्रत्युत्तर दिले. परंतु मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी 291 उमेदवारांच्या यादीत देबांशु भट्टाचार्य देव यांच्या नावाचा समावेश  
नव्हता. त्यांना हावडा मतदारसंघातून टीएमसीची उमेदवारी मिळू शकते असा अंदाज बांधला जात हाेता. देबांशु हे ममता बॅनर्जी यांचे कट्टर समर्थक आणि कार्यकर्ते मानले जातात परंतु त्यांना उमेदवारी नाकारल्याने चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. 

शरद पवारांना आमदार म्हणाले, तर आमचे राजकारण संपेल 

खेलाे हाेबे याचा अर्थ Game Is On असा हाेता. या गाण्याचे बोल टीएमसी कार्यकर्त्यांना उत्साहित करण्यासाठी देबांशू यांनी लिहिले आहेत. या गाण्यात ममता बॅनर्जी सरकारच्या 'कन्याश्री' आणि 'स्वास्थ्य साठी' यासारख्या योजनांचा उल्लेख आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()