पश्चिम बंगाल : दिलीप घोष यांच्यावर हल्ला; निवडणूक पुढे ढकलण्याची भाजपची मागणी

आरोप-प्रत्यारोपांनी पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा शेवट
Dilip Ghosh
Dilip Ghosh
Updated on

कोलकता : पश्‍चिम बंगालमधील ‘हॉट सीट’ ठरलेल्या भवानीपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारात सोमवारी शेवटचा दिवस तणावपूर्ण व नाट्यमय ठरला. भाजप व तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मारहाण, धक्काबुक्की झाली. दोन्ही पक्षांनी एकमेकांवर हल्ल्याचे आरोप केले. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांच्यावर ‘तृणमूल’च्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप पक्षाच्‍या नेत्यांनी केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घोष यांच्या सुरक्षा रक्षकाने हवेत गोळीबार केला. दरम्यान, ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी भाजपने केली आहे.

Dilip Ghosh
पुढे ढकललेल्या परीक्षा 'या' दिवशी होण्याची शक्यता; आरोग्य मंत्र्यांनी दिली माहिती

राज्‍याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या भवानीपूरमधून नशीब अजमावत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपकडून प्रियांका टिबरेवाल रिंगणात आहे. त्यांच्या प्रचार करताना घोष यांनी मतदारसंघातील जोडूबाबूर बझार येथील लसीकरण केंद्राला भेट दिली. त्यावेळी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की व हल्ला केल्याचा आरोप घोष यांनी केला. या उलट गर्दीला घाबरविण्यासाठी घोष यांच्या सुरक्षा रक्षकाने हवेत गोळीबार केल्याचा आरोप ‘तृणमूल’च्या कार्यकर्त्यांनी केला. तसेच पक्षाचे खासदार अर्जनसिंह यांच्यासमोर ‘परत जा’च्या नारा देण्यात आला.

Dilip Ghosh
Drugs Case : नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना जामीन मंजूर

लसीकरण केंद्रात उपस्थित असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोष यांना धक्काबुक्की केली. राज्य पुरस्कृत लसीकरण केंद्रात घोष प्रचार करीत असल्याचा आरोप करून त्यांनी तेथून निघून जाण्याची मागणी त्यांनी केली. सुरक्षा रक्षकांनी घोष यांना बाहेर आणल्यानंतर ते मोटारीत बसून निघून गेले. ‘तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माझ्‍यावर हल्ला केला. भाजपच्या कार्यकर्त्यांना जखमी केले,’ असा आरोप या सर्व प्रकाराने संतप्त झालेल्या घोष यांनी केला. ही कोणत्या प्रकारची निवडणूक आहे, असा प्रश्‍न करीत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

Dilip Ghosh
तालिबानी राजवटीत कॉलेजमधील तरुण-तरुणींना एकमेकांकडं पाहण्यास बंदी!

भाजपचे खासदार अर्जनसिंह हे या भागातील प्रचार प्रमुख आहेत. ते प्रचार करीत असताना उपस्थितांनी ‘परत जा’च्या घोषणा देण्यात आल्या. ते ‘बाहेरील’ असल्याची टीकाही करण्यात आली. खासदार व राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांवर हल्ले होत असताना राज्याचे प्रशासन व पोलिस काही करीत नसल्याचा आरोप अर्जनसिंह यांनी केला.

‘तृणमूल’कडूनही टीका

भाजप नेत्यांनी तृणमूल काँग्रेसवर टीका केल्यानंतर पक्षाचे नेते व ममता बॅनर्जी यांचे अत्यंत विश्‍वासू फिरहाद हकीम यांनी भाजपवर निशाणा साधताना मध्यवर्गीय राहत असलेल्या या भागातील शांततेचा भंग करण्यासाठी भाजप लोकांनी चिथावणी देत असल्याचा आरोप केला. ‘‘पराभवाची जाणीव झाल्याने भाजपने चिथावणी देण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणेच चांगले. द्वेष पसरविणे, खोटारडेपणा व वैयक्तिक हल्ले यामुळे सामान्य नागरिक त्यांचा निषेध करीत आहेत,’’ असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.