बीरभूम हिंसाचार प्रकरणाला मिळणार गती; CBI टीम बंगालात दाखल

West Bengal CBI Investigation
West Bengal CBI Investigationesakal
Updated on
Summary

सीबीआयनं पश्चिम बंगालमधील बीरभूम हिंसाचार प्रकरणाचा ताबा घेतलाय.

West Bengal CBI Investigation : पश्चिम बंगालमधील बीरभूम हिंसाचारप्रकरणी (Birbhum Violence) कोलकाता उच्च न्यायालयाच्या (Kolkata High Court) आदेशानंतर, केंद्रीय अन्वेषण ब्युरोनं (CBI) कालपासून तपास सुरू केलाय. कोलकाता उच्च न्यायालयानं बीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाट इथं तृणमूल काँग्रेस नेत्याच्या हत्येनंतर उसळलेल्या हिंसाचाराची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयानं सीबीआयला तपासाचे आदेश देताना, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसी सरकारनं स्थापन केलेल्या एसआयटीला या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रं सीबीआयकडं, तसंच अटक करण्यात आलेल्यांना सोपवण्यास सांगितलंय. दिल्लीतील CFSL तज्ञांसह 15 सदस्यीय CBI टीम बीरभूममध्ये दाखल झालीय.

सीबीआय तपास सुरू

'एएनआय'च्या अहवाल्यानुसार, सीबीआयनं पश्चिम बंगालमधील रामपूरहाट-बीरभूम हिंसाचार प्रकरणाचा ताबा घेतलाय. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी आणि सीएफएसएल (CFSL) तज्ञांसह एक पथक दिल्लीहून पाठवण्यात आलंय.

West Bengal CBI Investigation
कर्नाटक सरकार टिपू सुलतानचे धडे बदलणार

सुनावणीदरम्यान न्यायालयानं स्पष्टपणे सांगितलं की, पुरावे आणि घटनेचा प्रभाव हे दर्शवितो की राज्य पोलीस त्याचा तपास करू शकत नाहीत. त्यामुळं न्यायालयानं सीबीआयला 7 एप्रिलपर्यंत तपासाचा अहवाल सादर करण्यास सांगितलंय. या प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयानं याआधीच स्वतःहून दखल घेऊन सुनावणी केली होती. मात्र, त्यावेळी या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी फेटाळून लावत या प्रकरणाची चौकशी करण्याची पहिली संधी राज्याला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()