Mamata Banerjee : मोदी सरकारवर वारंवार टीका करणाऱ्या ममतांनी आपल्याच खासदाराला झापलं

ममता बॅनर्जींना मोदी सरकारवर टीका करताना वारंवार पाहिलं असेल, पण आता त्यांनी चक्क आपल्याच खासदाराला धारेवर धरलंय.
Mamata Banerjee Mahua Moitra
Mamata Banerjee Mahua Moitraesakal
Updated on
Summary

ममता बॅनर्जींना मोदी सरकारवर टीका करताना वारंवार पाहिलं असेल, पण आता त्यांनी चक्क आपल्याच खासदाराला धारेवर धरलंय.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banerjee) यांना मोदी सरकारवर (Modi Government) टीका करताना वारंवार पाहिलं असेल, पण आता त्यांनी चक्क आपल्याच खासदाराला धारेवर धरलंय. तृणमूल काँग्रेसमधील (Trinamool Congress) आक्रमक खासदार महुआ मोईत्रा (MP Mahua Moitra) यांना ममता बॅनर्जी यांनी चांगलंच सुनावलंय.

Mamata Banerjee Mahua Moitra
सूर्याजी पिसाळांनंतर रामराजेंची इतिहासात 'गद्दार' म्हणून नोंद होईल; भाजप आमदाराची सडकून टीका

तुमच्या मतदारसंघातच लक्ष द्या, पक्ष संघटनेत लुडबुड करू नका, असा सल्ला बॅनर्जींनी मोईत्रा यांना दिलाय. मोईत्रा कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातील (Krishnanagar Lok Sabha Constituency) खासदार आहेत. कोलकातामधील बूथ श्रेणीतील कार्यकर्त्यांशी बॅनर्जींनी संवाद साधताना मोईत्रा यांना हा सल्ला दिलाय. करीमपूर विधानसभा मतदारसंघातील (Karimpur Assembly Constituency) सर्व कामांकडे मुर्शिदाबादमधील खासदार अबू ताहिर यांना लक्ष घालू द्या, असं बॅनर्जींनी सांगितलंय.

Mamata Banerjee Mahua Moitra
उदयनराजेंनी चवताळून, चिडून कुजक्यासारखे माझ्यावर आरोप केलेत : शिवेंद्रसिंहराजे

पोटनिवडणुकीत विमलेंद्रु रॉय जिंकले होते

2016 मध्ये मोईत्रा या भागातून आमदार झाल्या होत्या. त्यामुळं या भागाकडं त्यांचा ओढा आहे. तसेच या भागातील कामकाजामध्ये त्या लक्ष घालत होत्या. त्यामुळं बॅनर्जींनी त्यांना समज दिलीय. मोईत्रा खासदार झाल्यानंतर येथील पोटनिवडणुकीत विमलेंद्रु रॉय जिंकले होते. तसेच अबू ताहिर यांना प्रभारी करण्यात आलं होतं. ही बाब लक्षात आणून देत हा भाग मोईत्रा यांच्या अधिकार क्षेत्राखाली येत नाही. अबू ताहिर हेच या भागाचे प्रभारी आहेत. त्यामुळं मोईत्रा यांनी इथं लक्ष घालू नये, असं बॅनर्जींनी स्पष्ट केलंय. काही दिवसांपूर्वी बॅनर्जी यांच्याकडं मोईत्रा यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()